HEALTH : सकाळी उठल्याबरोबर अनेकांना चहा सोबत बिस्कीट खाण्याची सवय असते. हा आपल्या दिवसाची सुरुवात करण्याचा सगळ्यात सोपा नाश्ता वाटतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ही छोटीशी वाटणारी सवय तुमच्या आरोग्यासाठी साखरेपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकते. डॉक्टर आणि डायटिशियन यांनी या सवयीवर गंभीर इशारा दिला आहे.
बाजारात मिळणारी बहुतांश बिस्किटे मैदा, डालडा, भरपूर साखर आणि प्रिझर्वेटिव्ह्जपासून बनलेली असतात. त्यात फायबरचे प्रमाण अजिबात नसते. एका बिस्कीटमध्ये जवळपास 40 टक्के फक्त मैदा आणि तेल असते. जेव्हा तुम्ही ते गरम चहा सोबत खाता, तेव्हा त्याचा परिणाम दुप्पट होतो.
1. पचन बिघडते: चहा मध्ये कॅफिन असते आणि बिस्कीटमध्ये मैदा. दोन्ही एकत्र पोटात गेल्यावर ऍसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. रोज सकाळी पोट साफ न होण्याचे हे एक मोठे कारण आहे.
2. शुगर लेवल अचानक वाढते: बिस्कीटमध्ये असलेला मैदा आणि साखर रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढवते. त्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते आणि थकवा जाणवतो. डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही सवय अतिशय घातक आहे.
3. वजन झपाट्याने वाढते: दोन बिस्कीटांमध्ये जवळपास 100 ते 150 कॅलरीज असतात, पण त्यातून शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही. याला एम्प्टी कॅलरीज म्हणतात. रोजच्या या सवयीमुळे पोटाभोवती चरबी वाढू लागते.
4. आतड्यांना चिकटून बसते: मैद्यापासून बनलेले बिस्कीट आतड्यांमध्ये चिकटून बसते. त्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता कमी होते आणि भविष्यात मोठे आजार होण्याची शक्यता वाढते.
डॉक्टरांच्या मते जर चहा प्यायचाच असेल तर सोबत बिस्कीटाऐवजी तुम्ही भाजलेले चणे, मखाना, 2 बदाम, 1 खजूर किंवा एक छोटी केळी खाऊ शकता. शक्य असेल तर चहा नंतर अर्ध्या तासाने काहीतरी हेल्दी खाणे जास्त चांगले. आणि पार्ले जी, मेरी सारखी बिस्किटे लहान मुलांना तर अजिबात देऊ नका, कारण त्यामुळे त्यांची भूक कमी होते आणि पोषण मिळत नाही.
त्यामुळे उद्यापासून चहा सोबत बिस्कीट खाण्याची सवय असेल तर ती आजच थांबवा. तुमचे पोट आणि आरोग्य दोन्ही तुम्हाला धन्यवाद देतील.