एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील जनरल विमा कंपनीने इयत्ता ८ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स क्विझ ज्युनियर या प्रमुख उपक्रमाच्या ११व्या एडिशनद्वारे तरुण पिढीमध्ये विमा साक्षरता आणि आर्थिक जागरूकता निर्माण करण्याची आपली कटिबद्धता पुढे नेली आहे.
क्विझच्या २०२६ एडिशनला संपूर्ण भारतातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये ४,८५० शाळांमधून जवळपास १६,९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील १४७ शहरांमधील जवळपास ५३० शाळांमधून २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी या क्विझसाठी नोंदणी केली आहे.
२०१६ मध्ये सुरू झाल्यापासून, एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स क्विझ ज्युनियरची पोहोच आणि व्याप्ती लक्षणीयरित्या वाढली आहे. एका शहरात १८ शाळांसह सुरू झालेली ही क्विझ आता भारतातील १,१०० हून अधिक शहरांमध्ये विस्तारली आहे. गेल्या एका दशकात या उपक्रमाने जवळपास ३ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून देशभरातील तरुण पिढीपर्यंत विमा जागरूकता आणि आर्थिक साक्षरता नेण्यासाठी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे डिजिटल बिझनेस ग्रुप अँड मार्केटिंगचे जॉइंट प्रेसिडेंट सोमेश सुराणा म्हणाले, “विमा म्हणजे मूलतः अनपेक्षित परिस्थितीसाठी सुसज्ज राहणे होय आणि आमचा विश्वास आहे की, विमा संकल्पना समजून घेण्याची सुरुवात लहान वयातच झाली पाहिजे. या प्रवासाला विशेषतः अर्थपूर्ण बनवणारी गोष्ट म्हणजे विविध प्रदेश, भाषा आणि पार्श्वभूमीतील विद्यार्थी एकाच उत्सुकतेने आणि उत्साहाने एकत्र येत आहेत. आम्ही ११व्या एडिशनमध्ये प्रवेश करत असताना आमचे उद्दिष्ट केवळ चांगले क्विझर्स तयार करणे एवढेच नसून जीवनातील अनिश्चिततेसाठी अधिक जागरूक, आत्मविश्वासी आणि तयार असलेली पिढी घडवणे हे आहे.”
या वर्षी, क्विझ कंटेंट १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता आणि क्विझसाठी नोंदणी केलेल्या शाळांपैकी २५ शाळा या प्रादेशिक/मातृभाषेच्या माध्यमातील होत्या, ज्यामुळे हा प्रोग्राम अगदी तळागाळापर्यंत पोहोचला आहे.
सध्या या क्विझच्या प्राथमिक फेऱ्या घेतल्या जात आहेत. या फेऱ्यांमधील अव्वल ३२ टीम्स व्हर्च्युअल विभागीय (झोनल) फेऱ्यांमध्ये ग्रँड फिनालेमधील आपल्या स्थानासाठी स्पर्धा करतील. एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स क्विझ ज्युनियरचे २०२६ एडिशनचे समापन २२ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित प्रत्यक्ष ग्रँड फिनालेमध्ये राष्ट्रीय विजेतेपदासाठी स्पर्धा करणाऱ्या ६ टीम्सच्या अंतिम सामन्यासह होईल.