HARSHAVARDHAN SAPKAL : संजय काकडेंचे राहुल गांधींना पत्र, हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, “ते ठीक आहे, कोणी कोणाला पत्र लिहू शकतं" नेमकं काय म्हणाले ? - टॉप न्यूज मराठी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या एका टिप्पणीमुळे मोठा वाद उफाळला आहे. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी 'गुंगी गुडिया' असा उल्लेख असलेले ट्विट केले होते. हा शब्द राम मनोहर लोहिया यांनी एकेकाळी इंदिरा गांधींसाठी वापरला होता, असा दावा काँग्रेसने केला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी हा शब्द वापरल्यानंतर राज्यभरातून टीका सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

या टिप्पणीला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये काँग्रेसच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. 

राष्ट्रवादीची मुख्य मागणी आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी.

हर्षवर्धन सपकाळांची भूमिका बदलली ?

कालपर्यंत या मुद्द्यावर ठाम असलेले सपकाळ आज मात्र मवाळ झाले. त्यांनी थेट माफी न मागता 'खेद' व्यक्त केला.

ते म्हणाले, "स्त्रियांचा सन्मान हा काँग्रेससाठी सर्वात महत्त्वाचा आहे. एका विशिष्ट संदर्भात केलेली टिप्पणी आहे. तिचा विपर्यास करू नये. पक्षाने याबाबत खेद व्यक्त करणारे ट्विट केले आहे. हा अनावश्यक वाद आहे." तसेच, "आम्हीच खरे निष्ठावंत आहोत हे दाखवण्यासाठी काही लोक मुद्दाम हे प्रकरण मोठे करत आहेत" असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की या वक्तव्यामुळे काँग्रेसची संस्कृती समोर आली आहे. एका महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा बचाव काय ?

सपकाळांनी या शब्दाला ऐतिहासिक संदर्भ दिला. "हा शब्द आम्ही नवीन तयार केला नाही. राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींसाठी वापरला होता. त्यावर तुम्ही बोलणार का?" असा सवाल त्यांनी भाजपला केला. "भाजप मुद्दाम महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता बिघडवत आहे. काँग्रेसची भीती वाटत असल्यामुळेच मुख्यमंत्री आम्हाला टार्गेट करत आहेत" असा पलटवारही त्यांनी केला.

एका ट्विटमधून सुरू झालेला हा वाद आता राज्यव्यापी आंदोलनापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसने खेद व्यक्त करून वाद शमवण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादी माफीवर ठाम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे राजकीय वादळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.