Gold Rate Today : सोनं 7 हजारांनी तर चांदी 10 हजारांनी कोसळली, आता खरेदी करावी का, जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज - टॉप न्यूज मराठी

अर्थकारण : सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 7 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सोनं 1 लाख 30 हजार रुपये तोळा होते, ते आता 1 लाख 23 हजार रुपयांवर आले आहे. तर चांदी 1 लाख 64 हजार रुपयांवरून 1 लाख 54 हजार रुपयांवर आली आहे. फक्त 24 तासांत दोन्हीमध्ये 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात डॉलरने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यात व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. तसेच सरकारी बॉण्डवर 5 टक्के व्याजदर मिळत असल्याने गुंतवणूकदार सोनं चांदीकडून तिकडे वळले आहेत. त्यामुळे दर घसरले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत अजून थोडी घसरण होऊ शकते. मात्र जानेवारीनंतर सोनं चांदीत पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे.