पुणे: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आज रविवारी, 31 ऑगस्ट रोजी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून 10 ग्रॅममागे तब्बल 6000 रुपयांपर्यंत भाव उतरला आहे.
IBJA च्या आजच्या अपडेटनुसार, आज महाराष्ट्रात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 1,58,240 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला आहे. तर दागिन्यांसाठी वापरले जाणारे 22 कॅरेट सोने 1,45,050 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने मिळत आहे. काल हाच दर 1 लाख 64 हजारांच्या पुढे होता.
जर तुम्ही आज मुंबई, पुणे, नागपूरमध्ये सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला 24K साठी 1,58,240 रुपये मोजावे लागतील. तर चांदीचा आजचा भाव 2,60,000 रुपये प्रति किलो आहे.