Ganesh Utsav 2026 : गणपतीला 21 दुर्वा का वाहतात? प्रत्येक दुर्वेमागचा अर्थ काय आहे आणि दुर्वा न मिळाल्यास काय वाहावे - टॉप न्यूज मराठी

Ganesh Utsav 2026 : गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत हे आपण सगळेच जाणतो. कोणतीही पूजा दुर्वेशिवाय पूर्ण होत नाही. पण गणपतीला नेहमी 21 दुर्वाच का वाहतात, कधी विचार केला आहे का. यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे.

कथा अशी आहे की प्राचीन काळी अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो ऋषीमुनींना खूप त्रास देत होता. सगळे देव गणपतीकडे गेले आणि मदत मागितली. तेव्हा गणपती बाप्पाने त्या राक्षसाला गिळून टाकले. राक्षस पोटात गेल्यामुळे गणपतीच्या पोटात खूप जळजळ होऊ लागली. सगळ्या देवांनी अनेक उपाय केले पण जळजळ थांबेना. तेव्हा 88 हजार ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वा गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या. दुर्वा थंड असतात त्यामुळे बाप्पाची जळजळ शांत झाली. तेव्हापासून गणपतीला 21 दुर्वा वाहण्याची परंपरा सुरु झाली.

21 या आकड्याचे पण महत्व आहे. 21 दुर्वा म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, 5 महाभूते आणि 1 मन. या सगळ्याचे मिळून 21 होते. म्हणजे 21 दुर्वा वाहणे म्हणजे आपले सर्वस्व बाप्पाला अर्पण करणे.

दुर्वा वाहताना त्या 3 पानांच्या असाव्यात आणि त्यांची गाठ मारून वाहाव्यात. दुर्वा नेहमी जोडीने वाहतात. आता प्रश्न असा आहे की जर दुर्वा मिळाल्या नाहीत तर काय करावे. अनेकांना शहरात दुर्वा सहज मिळत नाहीत. अशा वेळी तुम्ही बाप्पाला शमीचे पान वाहू शकता. शमीचे पान पण गणपतीला प्रिय आहे. दुसरा पर्याय म्हणजे तुळशी सोडून कोणतेही हिरवे पान तुम्ही भावने वाहू शकता. पण चुकूनही गणपतीला तुळस वाहू नका. गणपतीने तुळशीला शाप दिला होता त्यामुळे तुळस गणपतीला वाहणे वर्ज्य मानले जाते.

दुर्वा वाहताना गणपती अथर्वशीर्षातील दुर्वा मंत्र म्हणावा. याने बाप्पा लवकर प्रसन्न होतो असे मानले जाते.