Ganesh Utsav 2026 : गणपती बसवण्याची योग्य दिशा कोणती, वास्तुशास्त्रानुसार मूर्ती कुठे ठेवली तर सुख समृद्धी येते - टॉप न्यूज मराठी

Ganesh Utsav 2026 : गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आले आहे आणि सगळ्यांच्या घरात तयारी सुरु झाली आहे. मूर्ती सुंदर असावी, डेकोरेशन भारी असावे यावर आपण लक्ष देतो पण मूर्ती कोणत्या दिशेला बसवावी हे अनेकांना माहिती नसते. वास्तुशास्त्रानुसार गणपती बसवण्याची दिशा योग्य असेल तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

वास्तुशास्त्र काय सांगते, गणपती हा बुद्धीचा आणि समृद्धीची देवता आहे. त्यामुळे त्याची स्थापना नेहमी उत्तर-पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला करावी. या दिशेला देवतांची दिशा मानली जाते. जर तुमच्या घरात ईशान्य दिशा शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेलाही मूर्ती बसवू शकता. उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजेच धनाची दिशा मानली जाते. गणपतीची पाठ कधीही घराच्या मुख्य दरवाजाकडे किंवा दक्षिण दिशेला असू नये. असे मानले जाते की दक्षिण दिशेला यमाची दिशा आहे.

मूर्ती बसवताना आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा. गणपतीची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नका. एका छोट्या पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा टाकून त्यावर मूर्तीची स्थापना करा. मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे असावे म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे येईल. पूर्वेकडे तोंड करून पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच मूर्ती अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसभर थोडा तरी नैसर्गिक प्रकाश येईल. अंधाऱ्या कोपऱ्यात गणपती बसवू नये.

अनेक लोक चुकून गणपती बेडरूममध्ये किंवा टॉयलेटच्या भिंतीला लागून बसवतात, हे पूर्णपणे चुकीचे आहे. गणपती नेहमी हॉलमध्ये किंवा देवघरातच बसवावा. जिथे घरातील सगळ्यांना दर्शन घेता येईल. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी गणपती बसवत असाल तर मूर्तीचे तोंड उत्तरेकडे ठेवा, याने कामात यश मिळते असे मानले जाते.

दिशा बरोबर असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे यंदा गणपती आणताना फक्त डेकोरेशनवर नाही तर योग्य दिशेवर पण लक्ष द्या.

डिस्क्लेमर - या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यता, वास्तुशास्त्र, पौराणिक कथा आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. या लेखातील माहितीचा उद्देश कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नसून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. लेखातील माहिती 100 टक्के खरी असेल असा आम्ही दावा करत नाही.