Financial Rule Changes 2026: आयटीआर, आधार, पासपोर्ट, ईपीएफओ सोबतच ६ नियम बदलणार.... - टॉप न्यूज मराठी

१ जुलै २०२६ पासून भारतात प्राप्तिकर (ITR), आधार कार्ड, पासपोर्ट आणि बँकिंगसह तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे ६ प्रमुख नियम बदलले आहेत. या महत्त्वाच्या बदलांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे

१. आयटीआर (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत

आर्थिक वर्ष २०२५-२६ (आकलन वर्ष २०२६-२७) साठी ITR-1 आणि ITR-2 फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. या मुदतीनंतर रिटर्न भरल्यास ₹५ लाख पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ₹५,००० पर्यंत दंड आणि ₹५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना १,००० रुपये लेट फी भरावी लागेल.  

२. आधार कार्डमध्ये मोफत ईमेल अपडेट

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार मोबाईल ॲपद्वारे नोंदणीकृत ईमेल आयडी अपडेट करण्याचे ₹७५ शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.

ही मोफत सुविधा १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२६ या ६ महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. ]

३. नवीन पासपोर्ट काढणे महागले 

परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे.

आता नवीन किंवा नूतनीकरणाच्या सामान्य (Normal) ३६ पानी पासपोर्टसाठी ₹१,५०० ऐवजी ₹२,५०० आणि तातडीच्या (Tatkaal) पासपोर्टसाठी ₹३,५०० ऐवजी ₹५,००० शुल्क मोजावे लागेल. 

४. बँकांच्या 'मिस-सेलिंग'वर आरबीआयचा (RBI) नवीन नियम

बँकांकडून ग्राहकांना चुकीची आर्थिक उत्पादने (उदा. चुकीची इन्शुरन्स पॉलिसी किंवा म्युच्युअल फंड) विकण्याला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवीन नियम लागू केला आहे. जर बँकेने ग्राहकाची फसवणूक करून उत्पादन विकले असेल, तर ग्राहकाला पूर्ण पैसे परत (Refund) आणि नुकसानभरपाई मिळेल. तसेच बँक कर्मचाऱ्यांना आता सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच प्रमोशनल कॉल्स करता येतील.  

५. एचडीएफसी (HDFC) बँक क्रेडिट कार्ड नियम 

एचडीएफसी बँकेने देशांतर्गत एअरपोर्ट लाउंज ॲक्सेसच्या (Airport Lounge Access) नियमात बदल केला आहे. क्रेडिट कार्डधारकांना एका तिमाहीत ३ मोफत लाउंज भेटी मिळवण्यासाठी, त्याच्या मागील कॅलेंडर तिमाहीत किमान ₹६०,००० खर्च करणे अनिवार्य असेल. 

६. एसबीआय (SBI) क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स

एसबीआय कार्ड्सने (SBI Card) विशिष्ट क्रेडिट कार्ड्सच्या रिवॉर्ड प्रोग्राममध्ये बदल केले आहेत.

'PhonePe SBI Credit Card Purple' आणि 'Select Black' कार्ड्सवरून PhonePe ॲपद्वारे किंवा ऑनलाईन होणाऱ्या खर्चावरील रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यावर आता मर्यादा (Caping) घालण्यात आली आहे