FDA ची राज्यभर धडक कारवाई : सणासुदीच्या तोंडावर 2.22 कोटींचा भेसळयुक्त माल जप्त; तुमच्या ताटात विष तर नाही ना ? - टॉप न्यूज मराठी

दिवाळी म्हणजे गोडधोड, फराळ आणि एकत्र येण्याचा सण. पण याच गोडव्याचा फायदा घेऊन काही भेसळखोर आपल्या आरोग्याशी खेळत आहेत. हाच खेळ उधळून लावण्यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सणाच्या तोंडावर राज्यभरात मोठी मोहीम राबवली आहे.

नेमकी कारवाई काय झाली ?

FDA ने दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५ ऑक्टोबर २०२६ या पाच दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये १५० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये:

- एकूण मुद्देमाल: २.२२ कोटी रुपये

- स्वरूप: बनावट मावा, केमिकलने रंगवलेल्या मिठाया, मुदतबाह्य पनीर, निकृष्ट तेल, चुकीचे लेबल असलेले फराळाचे पदार्थ

- कायदेशीर कारवाई: १५ FIR दाखल, २६ जणांना अटक, २८ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले

मुंबई - ५ प्रसिद्ध ठिकाणांवर गंडांतर

FDA ने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. अंधेरी, वांद्रे, कालिना भागातील हाय-प्रोफाइल हॉटेल्समध्ये स्वच्छतेचे धिंडवडे निघाले.

  • स्वयंपाकघरात उंदीर, झुरळांचा वावर
  • फ्रीजमध्ये कच्चे आणि शिजलेले अन्न एकत्र
  • कामगारांना हातमोजे, टोपी नाही
  • या कारणांमुळे कॅफे सुलतान, लो फ्रेश, कंट्री क्लब, सुरज लामा मोमोज आणि कॅफे पाकीजा यांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.

भेसळ कशी ओळखाल ? 

१. खव्याची चाचणी: खवा हातावर चोळा, तेलकट वाटला आणि कडवट वास आला तर तो भेसळयुक्त असू शकतो.

२. रंगाची चाचणी: गुलाबजाम, जिलेबीचा रंग हाताला लागत असेल तर तो केमिकल कलर आहे.

३. पनीरची चाचणी: पनीर दाबल्यावर पाणी सुटत असेल आणि लवकर तुटत असेल तर तो बनावट आहे.

४. लेबल तपासा: FSSAI नंबर, बनवल्याची तारीख, एक्सपायरी डेट नसेल तर खरेदी करू नका.

५. पावती घ्या: कोणत्याही मिठाई दुकानातून पावती घ्यायला विसरू नका, तक्रार करताना ती उपयोगी पडते.

येवला, मनमाड, वैजापूरकरांसाठी सूचना

आपल्या उत्तर महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात राजस्थान आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात मावा येतो. FDA च्या सूत्रांनी Pen India ला सांगितले की, पुढील ८ दिवसांत नाशिक विभागात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. येवला नगरपरिषद हद्दीतील मिठाई दुकानदारांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी, अन्यथा कडक कारवाई होईल.

तक्रार कशी कराल ?

जर तुम्हाला कुठे भेसळ आढळली तर थेट या नंबरवर WhatsApp किंवा कॉल करा:

  • FDA टोल फ्री: 1800222365