मनोरंजन विश्व : मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा मिरांडा वॉर्निंग या सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा एका रिसॉर्टमध्ये घडणाऱ्या रहस्यमय हत्येभोवती फिरते. दोन जोडपी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत, अचानक घडलेली हत्या आणि त्यानंतर सुरू होणारा पोलिस तपास यातून संशयाचे जाळे घट्ट होत जाते. प्रत्येक पात्राच्या बोलण्यात काहीतरी लपलेले असल्याची जाणीव होते. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक करत आहेत. पुरावे, जबाब आणि घटनाक्रम यांची सांगड घालत ते सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट केवळ खुनी कोण यावर थांबत नाही, तर कायद्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष न्याय यातील फरकावरही भाष्य करतो. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आदिनाथ कोठारे याचे आतापर्यंतचे गाजलेले चित्रपट - पानिपत, 83, वेड, चांद्रमुखी, सत्यशोधक, पावनखिंड, जिवलगा, डब्बा कार्टेल, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.