Elon Musk- एलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलिनिअर - | एकाच दिवसात कमावले 45 अब्ज डॉलर - टॉप न्यूज मराठी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा वेगाने वाढ झाली आहे. गुरुवारी त्यांच्या एकूण  संपत्तीत एकाच दिवसांत सुमारे 45 अब्ज डॉलर्सची वाढ झाली, ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 722 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या वाढीमुळे एलॉन मस्क यांचे स्थान आणखीच बळकट झालं आहे. त्यामुळे आता ‘ट्रिलिनेअर क्लब’च्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसत आहेत. पण ही संपत्ती आणखी वेगाने वाढण्याची चिन्ह दिसत आहे.  ट्रिलिनिअर क्लबमधील ते एकमेव सदस्य ठरले आहे ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, या वर्षात आतापर्यंत एलॉन मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत इतर अब्जाधीशांची संपत्ती नगण्य भासते. या अहवालानुसार, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेज यांची एकूण संपत्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.