Dry Day : नागपूर पदवीधर मतदारसंघात दोन दिवस ड्राय डे, प्रशासनाचे दारू दुकानदारांना कडक आदेश - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ड्राय डे लागू करण्यात आला आहे. हा ड्राय डे 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत म्हणजे मतदान संपेपर्यंत असणार आहे. या काळात सर्व देशी दारूची दुकाने, विदेशी दारूची दुकाने, बियर शॉपी आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. कोणत्याही मद्यविक्रेत्याने नियम मोडल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर या मतदारसंघांचा समावेश आहे. या पाच जागांसाठी एकूण 182 उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी पाचही मतदारसंघात मिळून 2419 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.