मुंबई : महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी आज स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन (SIR) अंतर्गत ड्राफ्ट वोटर रोल म्हणजेच प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. घरोघरी पडताळणी आणि डिजिटायजेशन फॉर्म जमा न झाल्यामुळे लाखो मतदारांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दिल्लीत एकूण 1 कोटी 45 लाख मतदारांपैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे ड्राफ्ट लिस्टमधून कापली गेली आहेत. फक्त 97 लाख 53 हजार मतदारांचाच रेकॉर्ड डिजिटाईज झाला आहे. तर महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे ड्राफ्ट रोलमध्ये नाहीत. मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट, गैरहजर आणि परदेशात असलेल्या मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे.
घाबरून जाऊ नका, अजून संधी आहे ! तुमचे नाव यादीत नसेल तर मतदानाचा हक्क गेला असे नाही. तुम्ही पुन्हा नाव समाविष्ट करू शकता.
महत्त्वाच्या तारखा:
काय करावे ?
1. आधी https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ड्राफ्ट रोलमध्ये तुमचे नाव चेक करा.
2. नाव नसेल तर: नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म 6 भरा.
3. नावात दुरुस्ती / पत्ता बदलासाठी: फॉर्म 8 भरा.
4. एखाद्या अपात्र व्यक्तीचे नाव यादीत असेल तर: हरकत घेण्यासाठी फॉर्म 7 भरा.
अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.