Diwali 2026 : धनत्रयोदशीला सोने चांदी नाही तर कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ; कुबेर पूजेचा मुहूर्त काय - टॉप न्यूज मराठी

धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवशी धनाची देवता कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते. बऱ्याच जणांना वाटते की या दिवशी फक्त सोने चांदी खरेदी करावी, पण शास्त्रात सोन्याशिवाय इतरही अनेक वस्तू शुभ मानल्या आहेत.

सोने चांदी शक्य नसेल तर काय खरेदी करावे

1. पितळ किंवा तांब्याची भांडी - धनत्रयोदशीला पितळेची भांडी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. यम आणि धन्वंतरी यांना पितळ प्रिय आहे. स्वयंपाक घरासाठी पितळेचा लोटा, तांब्या, परात खरेदी करू शकता.

2. झाडू - या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे लक्ष्मी आगमनाचे प्रतीक मानले जाते. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे घरात झाडू आणल्याने दारिद्र्य दूर होते अशी मान्यता आहे.

3. धनिया म्हणजे धणे - धनत्रयोदशीला आख्खे धणे खरेदी करून लक्ष्मी पूजेत ठेवले जातात. नंतर हेच धणे दिवाळी पूजेत वापरून आपल्या तिजोरीत ठेवले तर धनवृद्धी होते.

4. गोमती चक्र आणि कवड्या - पूजेच्या साहित्य दुकानात गोमती चक्र, पिवळ्या कवड्या मिळतात. त्या खरेदी करून लक्ष्मी सोबत ठेवल्याने आर्थिक अडचण दूर होते.

5. मीठ - मीठ खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतीक आहे. थोडेसे खडे मीठ किंवा सैंधव मीठ या दिवशी घरात आणणे शुभ मानले जाते.

6. लक्ष्मी गणेशाची मूर्ती किंवा यंत्र - मातीची किंवा चांदीची नाही तर पितळेची लक्ष्मी गणेश मूर्ती, श्री यंत्र खरेदी करून त्याची दिवाळीपर्यंत पूजा करता येते.

कुबेर पूजेचा मुहूर्त 2026

यंदा धनत्रयोदशी शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत प्रदोष काळ आणि वृषभ लग्न दोन्ही आहेत, त्यामुळे लक्ष्मी कुबेर पूजेसाठी हा सर्वात उत्तम काळ आहे. यम दीपदानाची वेळ संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटांपासून ते 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत घराबाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने अपमृत्यू टळतो अशी मान्यता आहे.

पूजा कशी करावी

संध्याकाळी घर स्वच्छ करून उत्तर दिशेला तोंड करून बसावे. पाटावर नवीन लाल कापड टाकून त्यावर कुबेर, धन्वंतरी आणि लक्ष्मीचा फोटो ठेवावा. नवीन आणलेली भांडी, झाडू, धणे समोर ठेवून हळद कुंकू अक्षता वाहावी. 13 दिवे लावून ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः या मंत्राचा जप करावा.

या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू थेट वापरू नयेत, त्या आधी लक्ष्मी समोर ठेवून पूजा करावी आणि नंतर वापरावी.