कामाचा ताण, सततचा मोबाइल आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रोलिंग... यामुळे आज जवळपास प्रत्येक दुसरा व्यक्ती स्ट्रेस आणि झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात 20% पेक्षा जास्त लोकांना झोपेच्या तक्रारी आहेत. खराब झोप आणि जास्त स्क्रीन टाइम याचा थेट परिणाम आपल्या मेंटल हेल्थवर होतो. चिडचिड, एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी आणि नैराश्य यासारख्या समस्या वाढतात. पण घाबरू नका. लाइफस्टाईलमध्ये काही छोटे बदल केले तरी तुम्ही तणावमुक्त आणि शांत झोप मिळवू शकता.
1. Digital Overload: दिवसभर काम + घरीही 4-5 तास रील्स आणि न्यूज. मेंदूला विश्रांतीच मिळत नाही.
2. झोपेची अनियमितता: उशिरा झोपणे, उशिरा उठणे. यामुळे शरीराची जैविक घड्याळ बिघडते.
3. Self-Care चा अभाव: व्यायाम नाही, मित्रांसोबत बोलणे नाही, फक्त काम आणि मोबाइल.
डॉक्टरांच्या मते, चांगली झोप हीच अर्धी मेंटल हेल्थ आहे. झोप सुधारण्यासाठी हे नक्की करा
1. झोपण्याची वेळ ठरवा: रोज रात्री 11 आणि सकाळी 7 ही वेळ फिक्स करा. सुट्टीच्या दिवशीही वेळ बदलू नका.
2. झोपण्याआधी 1 तास "स्क्रीन फ्री" झोन: झोपण्याआधी मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही बंद करा. त्याऐवजी पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. स्क्रीनचा निळा प्रकाश झोपेचे हार्मोन "मेलाटोनिन" कमी करतो.
3. बेडरूम फक्त झोपेसाठी: बेडवर बसून काम किंवा रील्स पाहू नका. मेंदूला सिग्नल मिळेल की बेड म्हणजे फक्त झोप.
4. हलके जेवण आणि कोमट दूध: रात्री जड जेवण टाळा. झोपण्याआधी 30 मिनिटे कोमट दूध + जायफळ पावडर प्याल्यास शांत झोप लागते.
5. श्वासाचे व्यायाम: झोप येत नसेल तर 4-7-8 टेक्निक करा. 4 सेकंद श्वास घ्या, 7 सेकंद रोखा, 8 सेकंदात सोडा. 4 वेळा करा.
"मोबाइल कमी करा" म्हणणे सोपे आहे पण करणे कठीण. त्यासाठी हे ट्रिक्स वापरा:
1. App Timer लावा: अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये Digital Wellbeing / Screen Time फीचर आहे. Instagram, YouTube ला दिवसाला 30 मिनिटांचे लिमिट ठेवा. वेळ संपली की अॅप बंद होईल.
2. "No Phone Zone" बनवा: जेवताना आणि झोपताना मोबाइल बेडरूमच्या बाहेर ठेवा. चार्जिंगसाठी हॉलमध्ये ठेवा.
3. 20-20-20 नियम: कामासाठी स्क्रीन बघत असाल तर दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब पहा. डोळे आणि मेंदू दोन्हीला आराम मिळेल.
4. ऑफलाइन छंद जोडा: स्क्रोलिंगऐवजी 15 मिनिटे चालणे, बागकाम, चित्र काढणे, कुटुंबासोबत गप्पा मारा. मेंदूला नवा डोपामिन सोर्स द्या.
कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ?
वरचे सर्व उपाय करूनही 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ झोप येत नसेल, पॅनिक अटॅक येत असतील, किंवा सतत नैराश्य वाटत असेल तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. मेंटल हेल्थ ही कमजोरी नाही, तीही आरोग्याच एक भाग आहे.
शेवटचा मंत्र : तुमचा मोबाइल तुमचा बॉस नसावा. दिवसातून फक्त 30 मिनिटे स्वतःसाठी, स्क्रीनशिवाय द्या. 7 दिवसात तुम्हाला तुमच्या मनात आणि झोपेत फरक जाणवेल.