DHARMENDRA PRADHAN : संपूर्ण देशात गदारोळ, एक मोठी मागणी,'धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा', पण सरकार का राजीनामा घेत नाही ? - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलनाचा आज 32 वा दिवस आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले. संसदेवर मोर्चा नेण्याची हाक दिल्यानंतर सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा संसदेवर पोहोचू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, लाठी चार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप एवढे सगळे होऊन देखील केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा प्रश्न नेमका पडला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने 20 जुलै रोजी जेपी नड्डा यांना लेखी निवेदन दिले. यामध्ये प्रमुख मागणी आहे ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि NEET पेपरफुटी प्रकरणातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान एवढा गदारोळ होऊन देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा प्रश्न सामान्य जनतेला नक्कीच पडला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा सरकार का घेत नाही?

1. कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्या या कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधारावर नाहीत, असे सरकारचे मत असावे. कारण अद्याप यावर कोणत्याही प्रकारचा तपास किंवा अभ्यास करण्यात आलेला नाही. यावर कोणाचेही ठोस वक्तव्य नाही.

2. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत.

3. धर्मेंद्र प्रधान हे नवखे नाहीत. तब्बल बारा वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत.

4. आजपर्यंत कोणत्याही सामाजिक संघटना, विरोधी पक्ष यांमुळे मोदी सरकारमधील कोणाचाही राजीनामा घ्यावा लागलेला नाही. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला, तरीही मोदी यांच्या कार्यकाळातील पहिलीच घटना असेल.

 कोण आहेत धर्मेंद्र प्रधान?

धर्मेंद्र प्रधान हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत.

1. वैयक्तिक माहिती

- जन्म: 26 जून 1969, तालचेर, ओडिशा

- शिक्षण: उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वर येथून मानववंशशास्त्रात पदव्युत्तर

- वडील: दिवंगत देबेंद्र प्रधान - माजी केंद्रीय मंत्री 

2. राजकारणात प्रवेश कधी झाला?

धर्मेंद्र प्रधान यांनी राजकारणाला सुरुवात 1983 मध्ये केली.

- शाळेत असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP चे कार्यकर्ते बनले

- तालचेर कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते

- नंतर ABVP चे सचिव म्हणून काम पाहिले

- 1998 मध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला a7e3590e

3. निवडणूक पदे

1. ओडिशा विधानसभा सदस्य - 2000 ते 2004, पल्लहरा मतदारसंघ

2. लोकसभा सदस्य 14वी - 2004, देवगड मतदारसंघ

3. राज्यसभा सदस्य -

   - बिहार मधून 2012 ते 2018

   - मध्य प्रदेश मधून 2018 ते 2022

4. लोकसभा सदस्य 18वी - 2024 पासून, ओडिशाचे संबळपूर मतदारसंघ 

संघटनात्मक पदे:

- भाजप राष्ट्रीय सचिव आणि नंतर सरचिटणीस

- बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, ओडिशा, झारखंड या राज्यांचे पक्ष प्रभारी d551a7e3

केंद्रीय मंत्री पदे:

1. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री - 26 मे 2014 ते 6 जुलै 2021

   - सुरुवातीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, नंतर 2017 मध्ये कॅबिनेट मंत्री

   - 7 वर्षे या पदावर राहून ते सर्वात जास्त काळ काम करणारे पेट्रोलियम मंत्री बनले

2. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री - 3 सप्टेंबर 2017 ते 30 मे 2019 आणि पुन्हा 7 जुलै 2021 ते 2024

3. स्टील मंत्री - 30 मे 2019 ते 7 जुलै 2021

4. शिक्षण मंत्री- 7 जुलै 2021 पासून सध्या पर्यंत f1d2d551

4. महत्वाचे कार्य आणि योगदान

पेट्रोलियम मंत्री असताना:

- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY ची अंमलबजावणी केली. गरीब महिलांना 10.55 कोटींपेक्षा जास्त मोफत LPG कनेक्शन देण्यात आले

- PAHAL - जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना

- #GiveItUp मोहीम - श्रीमंतांनी LPG सबसिडी सोडण्यासाठी प्रोत्साहन

कौशल्य विकास मंत्री असताना:

- भारतातील युवकांसाठी स्किलिंग आणि रिस्किलिंगवर भर 

शिक्षण मंत्री असताना:

- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 ची अंमलबजावणी 

संघटनात्मक काम

- ओडिशामध्ये पक्ष संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत केली. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे

- उत्तराखंड 2017, कर्नाटक 2018, उत्तर प्रदेश 2022, बिहार 2025 निवडणुकांचे प्रभारी होते 

 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री आहेत.