Deputy CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; तज्ञांच्या निगराणीखाली उपचार सुरू - टॉप न्यूज मराठी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे. तथापि सध्या त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. 

सध्या महाराष्ट्रभर ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत एकनाथ शिंदे सातत्याने भेटीगाठी आणि राजकीय घडामोडींमुळे कामकाजाच्या वेळेत झालेला मोठा बदल यामुळे तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.  

काय म्हणाले आमदार बच्चू कडू 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, " त्यांच्याकडे सातत्याने गर्दी असते. एखादा सामान्य कार्यकर्ता ही त्यांना भेटायला गेला तर ते उपलब्ध असतात. रात्री एक दोन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटतात. त्यांनी आता स्वतःसाठी जगलं पाहिजे. शरीराच्या अडचणी वाढत जातील. 24 तास कामात राहणारा माणूस आहे. त्यांना स्वतःची तब्येत स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना लवकर बरे वाटावे आणि ते पुन्हा लोकांच्या सेवेत रुजू व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. " असं आमदार बच्चू कडू म्हणाले. त्याचबरोबर " कर्जमाफी संदर्भात पाच तारीख कशी दिली हे मला माहीत नाही. रविवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी कसा ठेवला ? आता तारीख वाढली तर अपेक्षा आहे की ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या सरकारन केल्या पाहिजेत. अजून दोन दिवस लांबले तरी चालेल मात्र कर्जमाफीत त्रुटी असायला नको. " असा स्पष्ट सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.