DAILY HOROSCOPE : मीन रास चांगला दिवस आहे, साकारात्मनक विचार राहतील; कन्या रास जुन्या आठवणींमध्ये मन अडकेल, तुमची रास कोणती ? - टॉप न्यूज मराठी

1. मेष - Aries - 21 मार्च ते 19 एप्रिल

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. आर्थिक बाबतीत आज खर्च जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे उधळपट्टी टाळा. कुटुंबात एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो पण संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा.

2. वृषभ - Taurus - 20 एप्रिल ते 20 मे

आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना बढतीचे संकेत आहेत. घरात एखादे शुभ कार्य ठरू शकते. आरोग्य एकदम उत्तम राहील. मित्रांकडून मदत मिळेल. आज तुम्ही कोणालाही पैसे उसने देऊ नका परत मिळायला वेळ लागेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.

3. मिथुन - Gemini - 21 मे ते 20 जून

आजचा दिवस थोडा धावपळीचा असणार आहे. सकाळपासून कामाचा ताण जास्त असेल. कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद घालू नका नाहीतर नुकसान तुमचेच होईल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. जोडीदाराची नाराजी दूर करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत पोटाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा. आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

4. कर्क - Cancer - 21 जून ते 22 जुलै

आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुम्ही जे काम हातात घ्याल ते पूर्ण होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने अडकलेली कामे मार्गी लागतील. मालमत्तेशी संबंधित वादातून सुटका मिळेल. प्रेम जीवनात आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करू शकता. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. संध्याकाळी नातेवाईकांची भेट होईल.

5. सिंह - Leo - 23 जुलै ते 22 ऑगस्ट

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा ते तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. पैशांची आवक चांगली राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात तुमचे मत महत्वाचे मानले जाईल. आरोग्य ठीक राहील पण थकवा जाणवेल. आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.

6. कन्या - Virgo - 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर

आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. व्यवसायात नफा वाढेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. आरोग्यात सुधारणा होईल. जुने मित्र भेटतील आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.

7. तूळ - Libra - 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर

आजचा दिवस खर्चिक असणार आहे. विनाकारण पैसा खर्च होईल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव जाणवेल त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता लागून राहील. प्रवास टाळलेला बरा. आज कोणाशीही वादात पडू नका. संध्याकाळी ध्यान किंवा देवपूजा केल्याने मन शांत होईल. प्रेम प्रकरणात सावध राहा.

8. वृश्चिक - Scorpio - 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर

आज तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल. आर्थिक लाभ होईल आणि कर्जातून मुक्तता मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. नवीन लोकांशी ओळख होईल ज्याचा भविष्यात फायदा होईल. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

9. धनु - Sagittarius - 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर

आज तुम्हाला कामात यश मिळेल. तुमची मेहनत फळाला येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. आरोग्य थोडे नरम गरम राहू शकते सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आज तुम्ही नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

10. मकर - Capricorn - 22 डिसेंबर ते 19 जानेवारी

आजचा दिवस भाग्यशाली आहे. नशिब तुमच्या बाजूने असेल. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करायचा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. लांबचा प्रवास घडू शकतो. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही केलेल्या मदतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. प्रेम जीवनात गोडवा वाढेल.

11. कुंभ - Aquarius - 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी

आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. आर्थिक बाबतीत सावध राहा कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला संयम ठेवावा लागेल. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका नाहीतर पश्चाताप होईल. संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल.

12. मीन - Pisces - 19 फेब्रुवारी ते 20 मार्च

आजचा दिवस आनंददायी जाणार आहे. सकाळीच एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे स्वागत होईल. आरोग्य चांगले राहील. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आज तुम्ही खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता. मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल.