मेष रास
आज तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल आणि ती तुम्ही उत्तम पार पाडाल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे, अचानक पैसा येण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळेल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा, बोलून प्रश्न सोडवा. आरोग्याची थोडी काळजी घ्या, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रवासाचा योग आहे. आज लाल रंग शुभ असेल.
वृषभ रास
आज खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे चुका टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस लाभदायक आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल, नाते अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जुनी गुंतवणूक फायदा देईल. आज तुम्हाला शांत राहण्याचा सल्ला आहे, वादविवाद टाळा. पांढरा रंग शुभ.
मिथुन रास
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल. मित्रांची भेट होईल आणि जुने संबंध ताजे होतील. नोकरीत प्रमोशनची चर्चा होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. लव्ह लाईफमध्ये सरप्राईज मिळेल. आरोग्य एकदम उत्तम राहील. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. आज तुमचे बोलणे इतरांना प्रभावित करेल. हिरवा रंग शुभ.
कर्क रास
आज भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरात एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. कामात मन लागणार नाही, पण काम टाळू नका. पैशाच्या व्यवहारात सावध रहा, कोणालाही उधार देऊ नका. तब्येतीकडे लक्ष द्या, पोटाचा त्रास होऊ शकतो. संध्याकाळी परिस्थिती सुधारेल आणि मन शांत होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. चंद्राला दूध अर्पण करा, फायदा होईल.
सिंह रास*
आज तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण करून दाखवाल. नेतृत्व करण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन होईल. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. आरोग्य चांगले राहील, पण झोप पूर्ण घ्या. सरकारी कामे आज पूर्ण होतील. सोनेरी रंग शुभ आहे.
कन्या रास
आजचा दिवस मेहनतीचा आहे. काम जास्त असेल पण त्याचे फळही तसेच मिळेल. आर्थिक बाबतीत विचार करून निर्णय घ्या. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. घरात शुभ कार्याचे योग आहेत. प्रेमात असलेल्यांनी घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. डोळ्यांची काळजी घ्या. निळा रंग शुभ.
तूळ रास
आज तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. नवीन लोकांशी ओळख होईल जी भविष्यात फायद्याची ठरेल. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. पैशाची आवक चांगली राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. आरोग्य उत्तम राहील. कलाक्षेत्रातील लोकांसाठी दिवस खास आहे. आज तुम्ही खूप खुश असाल. गुलाबी रंग शुभ.
वृश्चिक रास
आज थोडी सावधगिरी बाळगा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते. कामात अडथळे येतील पण संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कागदपत्रे नीट वाचा. रागावर नियंत्रण ठेवा. तब्येतीत थोडा थकवा जाणवेल. हनुमान चालीसा पठण करा, मन शांत होईल. प्रवास टाळलेला बरा. लाल रंगापासून दूर रहा.
धनु रास
आज नशिब तुमच्या सोबत आहे. सकाळपासूनच चांगल्या बातम्या मिळतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. परदेशाशी संबंधित कामे पूर्ण होतील. पैशाची चिंता दूर होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. लव्ह लाईफ रोमँटिक राहील. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यात मन लागेल. आज दानधर्म करा, पुण्य मिळेल. पिवळा रंग शुभ.
मकर रास
आजचा दिवस संमिश्र जाईल. कामाचा ताण जास्त असेल. पण मेहनत वाया जाणार नाही. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील, मोठी गुंतवणूक आज टाळा. कुटुंबातील सदस्याची मदत मिळेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो, शांतपणे बोला. आरोग्याची काळजी घ्या, पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. काळा रंग टाळा.
कुंभ रास
आज तुमच्या कल्पना शक्तीचा फायदा होईल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू कराल. सोशल मीडियावर तुमची चर्चा होईल. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात पाहुणे येतील. प्रेम संबंधात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आज एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. आकाशी रंग शुभ.
मीन रास
आज मन थोडे अस्वस्थ राहील. जुन्या आठवणींमध्ये अडकू नका. कामात लक्ष द्या, नवीन संधी दार ठोठावत आहे. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे, कर्ज फिटेल. कुटुंबासोबत वेळ घालवा, मन हलके होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर जेवण घ्या. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळेल. पाण्यात थोडी साखर टाकून पिंपळाला घाला.