DAILY HOROSCOPE : एकंदरीत सर्वच राशींसाठी आयुष्याच्या जोडीदारासोबत खास वेळ घालवण्याचा दिवस; जुने मतभेद विसरा नवी सुरुवात करा, तुमची रास कोणती! - टॉप न्यूज मराठी

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा असेल पण त्याचे फळ चांगले मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्व मिळेल. पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ - आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल आणि मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे खाणे टाळा.

मिथुन - आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे, अभ्यासात मन लागेल. प्रवासाचा योग आहे पण प्रवासात काळजी घ्या. संध्याकाळी जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.

कर्क - आज घरातील वातावरण आनंदी राहील. आईकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळेल पण घाईत निर्णय घेऊ नका. पैशाची आवक वाढेल.

सिंह - आज आत्मविश्वास वाढलेला असेल. तुम्ही जे काम हातात घ्याल ते पूर्ण होईल. समाजात मान सन्मान वाढेल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे.

कन्या - आजचा दिवस थोडा तणावाचा असू शकतो. कामाचा लोड जास्त असेल. पण संध्याकाळपर्यंत सगळे ठीक होईल. तब्येतीकडे लक्ष द्या, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

तूळ - आज नशीब तुमच्या बाजूने आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन ओळखी होतील ज्याचा भविष्यात फायदा होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनेल.

वृश्चिक - आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणाशीही वाद घालू नका. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला नाही.

धनु - आज प्रवासासाठी दिवस उत्तम आहे. धार्मिक कार्यात मन लागेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मकर - आज पैशाच्या बाबतीत सावध राहा. कोणालाही उधार देऊ नका. कामाच्या ठिकाणी थोडी अडचण येईल पण तुम्ही ती सोडवाल. संध्याकाळी आराम करा.

कुंभ - आजचा दिवस प्रेमासाठी खास आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. व्यवसायात फायदा होईल. नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करू शकता.

मीन - आज तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. जुने वाद संपतील. आरोग्य सुधारेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल.