DAILY HOROSCOPE : कुंभ रास काहीतरी नवीन शिका; नशीब मोठे वळण घेणार आहे ! तुमची रास कोणती ? - टॉप न्यूज मराठी

मेष - 21 मार्च ते 19 एप्रिल 

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. पैशांच्या बाबतीत आज थोडी सावधगिरी बाळगा, उगाच खर्च वाढू शकतो. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळेल ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्य उत्तम राहील पण प्रवास टाळलेला बरा.

वृषभ - 20 एप्रिल ते 20 मे 

आज तुम्हाला संयम ठेवावा लागेल. कोणत्याही वादात पडू नका नाहीतर दिवस खराब होऊ शकतो. नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य नाही. पैशांची आवक चांगली होईल पण जुन्या कर्जाची चिंता सतावेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल आणि नाते अधिक घट्ट होईल. पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो.

मिथुन - 21 मे ते 20 जून 

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. अडकलेले पैसे परत मिळतील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. मित्रांची भेट होईल आणि एखाद्या नव्या प्रोजेक्टवर चर्चा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे, अभ्यासात मन लागेल. प्रेम जीवनात थोडी नाराजी येऊ शकते पण संध्याकाळपर्यंत सर्व ठीक होईल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

कर्क - 21 जून ते 22 जुलै 

आज तुम्हाला कामात यश मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होईल. घरात शांतता राहील आणि आई वडिलांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज मोठा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या, सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. संध्याकाळी देवदर्शनाचा योग आहे.

सिंह - 23 जुलै ते 22 ऑगस्ट 

आज भाग्य तुमच्या बाजूने आहे. नोकरीत प्रमोशनची बातमी मिळू शकते. पैशांच्या गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे, सोने किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर बनलेले काम बिघडू शकते. पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो.

कन्या - 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर

आजचा दिवस थोडा खर्चिक असणार आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष द्या. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहा. जोडीदाराकडून एखादे गोड सरप्राईज मिळेल. आरोग्य सामान्य राहील पण झोप पूर्ण घ्या. आज कोणालाही उधार देऊ नका.

तूळ - 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर 

आज तुम्हाला नवीन संधी मिळतील. बेरोजगार असाल तर नोकरीचा कॉल येऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा आहे. प्रेम संबंधात गोडवा वाढेल आणि लग्नाची बोलणी पुढे जातील. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. मानसिक तणाव कमी होईल आणि मन प्रसन्न राहील. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृश्चिक 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 

आज तुमची ऊर्जा वाढलेली असेल. कठीण वाटणारे कामही तुम्ही सहज पूर्ण कराल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. आईच्या आरोग्याची चिंता वाटेल पण काळजी करण्यासारखे काही नाही. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. संध्याकाळी मित्रांसोबत पार्टीचा प्लॅन होईल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

धनु - 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. सकाळी थोडा तणाव जाणवेल पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. प्रवासाचा योग आहे पण सामानाची काळजी घ्या. व्यवसायात नवीन पार्टनरशिपचा विचार करू शकता. आरोग्य उत्तम राहील. आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.

मकर - 22 डिसेंबर ते 19 जानेवारी 

आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन बक्षीस देऊ शकतात. जमीन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होईल. थंडीपासून स्वतःचा बचाव करा. जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतो.

कुंभ - 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 

आजचा दिवस तुमच्यासाठी शिकण्याचा आहे. नवीन काहीतरी शिकायला मिळेल ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढेल पण तुम्ही तो सांभाळून घ्याल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. प्रेम जीवनात नवीन वळण येईल. डोळ्यांची काळजी घ्या, मोबाईलचा वापर कमी करा.

मीन - 19 फेब्रुवारी ते 20 मार्च 

आज तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. अचानक धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे खाणे टाळा. आज तुम्ही केलेली मदत भविष्यात तुमच्याच कामी येईल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.