Daily Horoscope : कुंभ रास प्रेम जीवनात सुख मिळेल ; वृश्चिक रास संध्याकाळी गोड बातमी कळेल, आज तुमचा दिवस कसा ? - टॉप न्यूज मराठी

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे, सकाळपासूनच तुमच्या मनात नवीन उत्साह असेल, कामाच्या ठिकाणी तुम्ही दिलेले प्रेझेंटेशन सगळ्यांना आवडेल, वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन जबाबदारी देतील, आर्थिक बाबतीत जुनी गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल, कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होईल, जोडीदारासोबत संध्याकाळी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल, आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवेल त्यामुळे वेळेवर झोप घ्या, विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे, शुभ रंग लाल आणि शुभ अंक 9 आहे.

वृषभ - आज मन शांत आणि प्रसन्न राहील, गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आज पूर्ण होतील, व्यवसायात तुम्हाला एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, नोकरी करणाऱ्यांना आज बढती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते, पैशाची आवक चांगली राहील पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, जुन्या मित्राची अचानक भेट होऊन मन आनंदी होईल, लांबच्या प्रवासाचे योग बनत आहेत, कोणाशीही वादात पडू नका शांत राहा, तब्येत चांगली राहील, शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 6 आहे.

मिथुन - आज आत्मविश्वासात मोठी वाढ होईल, नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे योग आहेत, प्रेम संबंधात असलेला गैरसमज आज दूर होईल, आरोग्य एकदम चांगले राहील आणि मनात सकारात्मकता राहील, आई-वडिलांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल, संध्याकाळी घरात पाहुणे येऊ शकतात, शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 आहे.

कर्क - आज दिवस थोडा तणावाचा जाऊ शकतो, कामाचा भार जास्त असल्याने मनावर दडपण येईल, पैशाच्या व्यवहारात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कोणालाही उसने पैसे आज देऊ नका, कुटुंबात एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, बोलताना शब्द जपून वापरा नाहीतर नाते बिघडेल, दुपारनंतर एखादी चांगली बातमी मिळून मन प्रसन्न होईल, वाहन चालवताना जास्त काळजी घ्या, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, शुभ रंग मोत्यासारखा पांढरा आणि शुभ अंक 2 आहे.

सिंह - आज नशिब तुमच्या बाजूने राहील, बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील, नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज योग्य वेळ आहे, व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल, समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान वाढेल, प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, मित्रांकडून तुम्हाला मदत मिळेल, नवीन घर किंवा गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, आरोग्य चांगले राहील, शुभ रंग केशरी आणि शुभ अंक 1 आहे.

कन्या - आजचा दिवस संमिश्र जाईल, सकाळच्या वेळी थोडी अस्वस्थता आणि निराशा वाटेल, दुपारनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने सुधारेल, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल, खर्च जास्त होईल त्यामुळे बजेट सांभाळून चला, पोटाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, प्रवास करत असाल तर कागदपत्रे जपून ठेवा, कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवाल, शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 आहे.

तूळ - आज नवीन लोकांशी ओळख होईल, ही ओळख भविष्यात तुमच्या खूप कामाला येईल, व्यापारी वर्गाला आज मोठी डील मिळण्याची शक्यता आहे, नोकरीत तुम्हाला नवीन पद किंवा जबाबदारी मिळेल, कुटुंबासोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बेत कराल, आरोग्य उत्तम राहील आणि मनात उत्साह असेल, अविवाहित लोकांसाठी लग्नाचे चांगले स्थळ येईल, पैशाची आवक चांगली राहील, घरात आनंदाचे वातावरण असेल, शुभ रंग गुलाबी आणि शुभ अंक 6 आहे.

वृश्चिक - आज तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, बऱ्याच दिवसांपासून पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होईल, प्रॉपर्टी खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे, कोर्ट कचेरीची कामे असतील तर त्यात विजय मिळेल, मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला मदत मिळेल, रागावर थोडे नियंत्रण ठेवा नाहीतर काम बिघडेल, पाठीच्या दुखण्याचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्या, संध्याकाळी एखादे गोड बातमी मिळेल, आर्थिक लाभ होईल, शुभ रंग लाल आणि शुभ अंक 9 आहे.

धनु - आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल, मुलांकडून तुम्हाला एखादी खूप चांगली बातमी मिळेल, परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण होण्याची वेळ आली आहे, शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना मोठे यश मिळेल, आर्थिक लाभ चांगला होईल, धार्मिक कामात तुमचे मन रमेल, जोडीदाराचा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा मिळेल, घरात पाहुण्यांची ये-जा राहील, तब्येत चांगली राहील, शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 3 आहे.

मकर - आज कामात थोडे अडथळे येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवून काम करा, वरिष्ठांशी आज अजिबात वाद घालू नका, नोकरीची काळजी असलेल्यांनी आज जास्त लक्ष देऊन काम करावे, पैशाची थोडी चणचण जाणवेल, घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, संध्याकाळी मित्र तुम्हाला मदत करतील, अनावश्यक खर्च टाळा, प्रवास पुढे ढकलला तर बरे होईल, शुभ रंग निळा आणि शुभ अंक 8 आहे.

कुंभ - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील, सकाळपासूनच सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील, व्यवसायात चांगली प्रगती होईल, नवीन पार्टनरशिप करणार असाल तर ती फायदेशीर ठरेल, प्रेम संबंधात गोडवा वाढेल आणि विवाहितांचे संबंध सुधारतील, आरोग्याच्या बाबतीत सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो, पैशाची आवक वाढेल, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल, शुभ रंग आकाशी आणि शुभ अंक 8 आहे.

मीन - आज खर्चाचे प्रमाण जास्त राहील, त्यामुळे शॉपिंग किंवा अनावश्यक खरेदी टाळा, कामाच्या ठिकाणी लक्ष द्या नाहीतर छोटी चूक मोठी होऊ शकते, कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहून प्रश्न सोडवा, लांबचा प्रवास आज टाळलेलाच बरा, डोकेदुखी किंवा थकव्याचा त्रास होऊ शकतो, कोणालाही जामीन राहू नका, पैशाच्या व्यवहारात सावध राहा, संध्याकाळी थोडा आराम करा, शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 3 आहे.