Daily Horoscope : कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात; वाणीवर नियंत्रण ठेवा ! वाचा तुमची राशिभविष्य - टॉप न्यूज मराठी

मेष - आजचा दिवस धावपळीचा राहील, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील, आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि जोडीदारासोबत वेळ घालवाल, प्रकृतीची काळजी घ्या, शुभ रंग लाल, शुभ अंक 9, आजचा उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा.

वृषभ - आज मन प्रसन्न राहील आणि रखडलेली कामे मार्गी लागतील, व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि नोकरदार वर्गाला बढतीचे योग आहेत, पैशांची आवक वाढेल पण खर्चही वाढेल, मित्रांची भेट होईल आणि प्रवासाचे योग आहेत, वादविवाद टाळा, शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6, आजचा उपाय गाईला चारा खाऊ घाला.

मिथुन - आज आत्मविश्वास वाढेल आणि नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे, विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत चांगली बातमी मिळेल, प्रेम संबंधात गोडवा येईल आणि आरोग्य चांगले राहील, आई-वडिलांचे आशीर्वाद मिळतील, शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5, आजचा उपाय विष्णू सहस्रनामाचे पठण करा.

कर्क - आज थोडा तणाव जाणवेल आणि कामाचा दबाव वाढेल, पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा आणि कोणालाही उसने पैसे देऊ नका, कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा, संध्याकाळी चांगली बातमी मिळेल, शुभ रंग मोती, शुभ अंक 2, आजचा उपाय शिवलिंगावर जल अर्पण करा.

सिंह - आज भाग्य तुमच्या बाजूने असेल आणि अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे आणि व्यवसायात मोठा नफा होईल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि प्रेमी युगुलांसाठी दिवस रोमँटिक आहे, शुभ रंग केशरी, शुभ अंक 1, आजचा उपाय सूर्याला जल अर्पण करा.

कन्या - आजचा दिवस संमिश्र राहील सकाळी थोडी निराशा जाणवेल पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो, वाहन चालवताना काळजी घ्या, शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5, आजचा उपाय गणपती अथर्वशीर्ष वाचा.

तूळ - आज नवीन ओळखी होतील आणि या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील, व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळेल आणि नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत आखाल आणि आरोग्य उत्तम राहील, अविवाहितांना लग्नाचे स्थळ येईल, शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6, आजचा उपाय लक्ष्मी मातेची पूजा करा.

वृश्चिक - आज मेहनतीचे फळ मिळेल आणि बऱ्याच दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होईल, प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत आणि कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल, मित्रांकडून मदत मिळेल पण रागावर नियंत्रण ठेवा, पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो, शुभ रंग लाल, शुभ अंक 9, आजचा उपाय हनुमान चालिसा वाचा.

धनु - आजचा दिवस आनंदात जाईल आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल, परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल आणि धार्मिक कार्यात मन रमेल, जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल, शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3, आजचा उपाय दत्तगुरुंचे दर्शन घ्या.

मकर - आज कामात अडथळे येतील त्यामुळे संयमाने काम घ्या, वरिष्ठांशी वाद घालू नका आणि नोकरी जाण्याची भीती असलेल्यांनी जपून राहावे, पैशाची चणचण जाणवेल आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते, संध्याकाळी मित्र मदतीला येतील, शुभ रंग निळा, शुभ अंक 8, आजचा उपाय शनी मंदिरात तेल अर्पण करा.

कुंभ - आजचा दिवस उत्तम आहे आणि सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन पार्टनरशिप फायदेशीर ठरेल, प्रेमात यश मिळेल आणि विवाहितांचे संबंध सुधारतील, आरोग्याची काळजी घ्या सर्दी-खोकला होऊ शकतो, शुभ रंग आकाशी, शुभ अंक 8, आजचा उपाय गरजूंना मदत करा.

मीन - आज खर्च जास्त होईल त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा, कामाच्या ठिकाणी लक्ष द्या चुका होण्याची शक्यता आहे, कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो त्यामुळे शांत राहा, प्रवास टाळलेला बरा आणि डोकेदुखीचा त्रास होईल, शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3, आजचा उपाय केळीच्या झाडाची पूजा करा.