Daily Horoscope : कन्या रास व्यवसायात दुप्पट नफा मिळवाल ; मिथुन रास फक्त वाणी सांभाळा... वाचा तुमचे राशीं भविष्य - टॉप न्यूज मराठी

1. मेष (21 मार्च - 19 एप्रिल)

आजचा दिवस तुमच्यासाठी विजयाचा आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. अडकलेले पैसे परत मिळतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन होईल. प्रेमात गोडवा वाढेल. आरोग्य उत्तम राहील पण डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. शुभ रंग - लाल.

2. वृषभ (20 एप्रिल - 20 मे)

जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. घरात शुभ कार्य घडेल. जोडीदारासोबत वाद टाळा, बोलताना संयम ठेवा. शुभ रंग - पांढरा.

3. मिथुन (21 मे - 20 जून)

आज बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. पैशाच्या बाबतीत उधारी देऊ नका. प्रवास टाळलेला बरा. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळेल. शुभ रंग - हिरवा.

4. कर्क (21 जून - 22 जुलै)

आज मन प्रसन्न राहील. नातेवाईकांची भेट होईल. प्रॉपर्टीचे काम पूर्ण होईल. आईकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना आज कॉल येण्याची शक्यता आहे. पोटाच्या विकाराकडे लक्ष द्या. शुभ रंग - मोत्यासारखा पांढरा.

5. सिंह (23 जुलै - 22 ऑगस्ट)

तुमच्या राशीत सूर्य आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल. नेतृत्व करण्याची संधी मिळेल. बढती किंवा पगारवाढीचे योग आहेत. प्रेमात असलेल्यांसाठी लग्नाचा प्रस्ताव येईल. खर्च जास्त होईल पण काळजी करू नका. शुभ रंग - सोनेरी.

6. कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

आजचा दिवस मेहनतीचा आहे. दिवसभर धावपळ राहील. पण संध्याकाळी मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात नफा दुप्पट होईल. विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - निळा.

7. तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

भागीदारीत व्यवसाय असेल तर आज मोठा निर्णय घ्याल. कोर्ट-कचेरीच्या कामात विजय मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. 

 मित्रांसोबत वेळ घालवाल. प्रेम संबंध घट्ट होतील. शुभ रंग - गुलाबी.

8. वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर काम बिघडेल. वाहन सावकाश चालवा. आज कोणालाही पैसे उसने देऊ नका. नोकरीत बॉसशी मतभेद होऊ शकतात. संध्याकाळी ध्यान किंवा देवपूजा केल्याने मन शांत होईल. शुभ रंग - मरून.

9. धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

नशीब आज तुमच्या बाजूने आहे. अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांना संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंद राहील. शुभ रंग - पिवळा.

10. मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

कामाचा ताण आणि थकवा जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा. जुने मित्र मदतीला धावून येतील. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा, मन हलके होईल. शुभ रंग - काळा.

11. कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक लाभाचे अनेक मार्ग मोकळे होतील. प्रेमात असलेल्यांसाठी दिवस रोमँटिक आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्याची साथ मिळेल. शुभ रंग - जांभळा.

12. मीन (19 फेब्रुवारी - 20 मार्च)

आज अध्यात्माकडे ओढ वाढेल. मन शांत राहील. दानधर्म कराल. अडकलेले सरकारी काम पूर्ण होईल. पैशाची चिंता मिटेल. जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. शुभ रंग - केशरी.