DAILY HOROSCOP : कर्मावर विश्वास ठेवा, सगळं छान होणार आहे ! वाचा तुमचे राशी भविष्य - टॉप न्यूज मराठी

शनिवार 25 जुलै 2026 आज नशीब काय सांगतंय.  

1. मेष

आज कामाचा लोड जास्त राहील पण बॉस खुश होतील.पैसे हातात येतील पण खर्चावर कंट्रोल ठेवा.घरात लहान मुलांची तब्येत सांभाळा.लव लाईफ मध्ये जोडीदाराशी वाद टाळा, शांतपणे बोला.

सल्ला: घाईघाईत निर्णय घेऊ नका.

2. वृषभ

आज जुनी देणी परत मिळण्याचा योग आहे.ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल.पालकांनो मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.लव लाईफ मध्ये पार्टनरला वेळ दिल्यास नातं गोड होईल.

सल्ला: गुंतवणूक करताना विचार करा.

3. मिथुन

बोलण्याने आज कामं मार्गी लागतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लागेल.घरात पाहुणे येऊ शकतात.लव लाईफ मध्ये गैरसमज दूर होतील.

सल्ला: वाणी सांभाळा .

4. कर्क

मन आज जरा भावनिक राहील.कामाचा ताण आहे पण घाबरू नका, जमेल.आई-वडिलांचा सल्ला कामी येईल.लव लाईफ मध्ये वेळ द्या, जवळीक वाढेल.

सल्ला: रात्री लवकर झोपा.तुमची एन्झायटी वाढते आहे. 

5. सिंह

आज तुमचा कॉन्फिडन्स टॉपवर राहील.नोकरीत नवीन संधी मिळू शकते.विद्यार्थी क्रिएटिव्ह कामात चमकतील.लव लाईफ मध्ये डेट प्लॅन करा.

सल्ला: इगो बाजूला ठेवा. थोड चिंतन करा. 

6. कन्या

बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्या. ऑफिसमध्ये चूक झाली तर लगेच सुधारा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा चांगला दिवस. लव लाईफ मध्ये पार्टनरचा सपोर्ट मिळेल.

सल्ला: प्लॅनिंगने काम करा.

7. तूळ

आज बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे. टीमवर्कने ऑफिसचे काम लवकर होईल. घरात आनंदाची बातमी येईल. लव लाईफ मध्ये प्रपोजसाठी दिवस चांगला.

सल्ला: सर्वांना बरोबर घेऊन चला.

8. वृश्चिक

आज सावध राहा, मागून बोलणारे आहेत. ऑफिस पॉलिटिक्समध्ये पडू नका. मुलांच्या मित्रांवर लक्ष ठेवा.

लव लाईफ मध्ये इगो नको, माफी मागा.

सल्ला: शांत रहा.अतिउत्साह नको.

9. धनु

नशीब तुमच्या बाजूने आहे.नोकरीत चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करतील.लव लाईफ मध्ये लग्नाची चर्चा होऊ शकते.

सल्ला: संधी सोडू नका.

10. मकर

कष्टाचं फळ आज दिसेल. प्रमोशन किंवा इन्क्रिमेंटचे संकेत. पालकांनी मुलांना शिस्त लावा. लव लाईफ मध्ये फॅमिलीला भेटवू शकता.

सल्ला: फालतू खर्च टाळा. आज खिसा पहा. 

11. कुंभ

नवीन आयडिया ट्राय करण्यासाठी दिवस चांगला. टेक्निकल कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये फायदा.लव लाईफ मध्ये नवीन सुरुवात होईल.

सल्ला: जुने मित्र भेटतील.हलकाफुलका दिवस आहे. 

12. मीन

आज आध्यात्मिक दिवस आहे. नोकरीत क्रिएटिव्ह काम मिळेल. दानधर्म केल्याने मन शांत होईल.लव लाईफ मध्ये जुना प्रेम आठवेल.

सल्ला: देवावर भरोसा ठेवा.सगळं छान होणार आहे.