DAILY HOROSCOP : मीन रास खुश आहात पण मन स्थिर नाही; कर्क रास श्री गणेशा करणार ! वाचा तुमचे राशिभविष्य - टॉप न्यूज मराठी

मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 

आषाढ शुक्ल अष्टमी 

नक्षत्र रात्री 8:49 पर्यंत चित्रा त्यानंतर स्वाती

रास सकाळी 7:55 पर्यंत कन्या त्यानंतर तूळ

राहु काळ दुपारी 3 ते 4:३0

मेष रास 

खुश आहात ! आजच्या आनंदाला कारण नाही पण मन शांत आहे. नोकरी व्यवसायात आणि कुटुंबात वातावरण शांत आहे. 

वृषभ रास 

अति घाई आणि हट्ट नको. आरोग्याची थोडी काळजी घ्या. बाकी नोकरीत दिवस चांगला आहे. कुटुंबासोबतही दिवस चांगला आहे.पण उगाच कुणाचे मन दुखेल अशी चेष्टा सुद्धा करू नका. 

मिथुन रास 

कामाचा थोडा ताण येणार आहे. पण दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम पूर्ण करा. टाळू शकाल असं थोडं काम उद्यावर ढकलून द्या आज हरकत नाही. 

कर्क रास 

नवीन प्रकल्पांसाठी आज सुरुवात करू शकता. राहू काळ टाळा, आणि श्री गणेशा म्हणा !

सिंह रास 

कामकाजाचा ताण आहे. पण प्रामाणिकपणे जिद्दीने काम पूर्ण कराच. फळ गोड मिळेल आज कोणीतरी व्यक्ती भेटणार आहे.

कन्या रास 

दिवस सामान्य आहे. कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य ठरेल. त्यामुळे विशेष पक्वान्न खाणार आहात. नोकरी व्यवसायात दिवस चांगला. 

तुळ रास 

अडचणी कमी होत आहेत. मन सकारात्मक आहे. आर्थिक लाभ देखील मिळतील. थोडं लोक ओळखायला शिका. 

वृश्चिक रास 

आज थोडा खिसा जपून. किरकोळ चोरी किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतो. कागदोपत्री जर कामकाज कुठले रखडले असेल तर आज पूर्ण करा. 

धनु रास 

थोडी तब्येत सांभाळा. बाकी दिवस उत्तम. नवीन लोकांना भेटायला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कुटुंबातील वातावरण छान राहील. 

मकर रास 

आरोग्य उत्तम आहे. नोकरी व्यवसायात उत्तम परिस्थिती आहे. कुटुंबामध्ये बोलताना जरा जिभेवर गोडवा ठेवा. मना सारखं वागा, पण वागवायला जाऊ नका. स्वतः सोबत दुसऱ्याचेही मन जपा. 

कुंभ रास 

आज कुणीतरी खास व्यक्ती भेटणार आहे. खूप दिवसांनी मनात कोणासाठी तरी ओढ जाणवेल. खुश असाल, पण आनंद लपवून ठेवाल. वेगळा दिवस.

मीन रास 

नोकरी व्यवसायात कुटुंबात छान दिवस आहे. आर्थिक स्थिती उत्तम आहे. मन खुश आहे, पण स्थिर नाही. वाहन चालवताना किंवा आरोग्याच्या एखाद्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका.