आज शनिवार दिनांक 18 जुलै 2026, आषाढ शुक्लपंचमी, नक्षत्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्वा त्यानंतर उत्तरा, रास - सिंह रात्री 11:59 मिनिटांपर्यंत त्यानंतर कन्या
राहुकाळ सकाळी 9 ते 10:30
मेष रास
आज तुम्हाला सर्वच ग्रहांची साथ मिळणार आहे. दिवस सकारात्मक आहे. आरोग्य देखील साथ देणार आहे. एखादी कला जोपासा.
वृषभ रास
आज काही नवीन भेटीगाठी होणार आहेत. भविष्यात या भेटीगाठींचा खास उपयोग होईल. जिभेवर साखर ठेवा.
मिथुन रास
दिवस आज हलकाफुलका आहे. मित्रपरिवारासोबत बाहेर जाण्याचा बेत आखाल. आरोग्य उत्तम.
कर्क रास
आर्थिक बाजू भक्कम आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे आजच उरकून घ्या.
सिंह रास
येणारा दिवस नवीन चांगलं काहीतरी घेऊन येत असतो. आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा. वाचन करा, चिंतन करा.
कन्या रास
आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या होऊ देऊ नका. कामकाजात स्वतःला गुंतलेले राहू द्या. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
तूळ रास
चांगला दिवस आहे. काही नवीन ओळखी होणार आहेत. स्वतःसाठी नवीन खरेदी कराल. कपडे, दागिने, तांत्रिक उपकरणांची आज स्वतःसाठी खरेदी कराल.
वृश्चिक रास
मन प्रसन्न आहे. पण आनंदाच्या भरातही चुकीचे निर्णय टाळा. गोड शब्दांना हुरळून जाणे सोडा. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
धनु रास
ग्रहमान चांगले आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दोन पावलं मागे या. वीकेंड आराम करा. मानसिक थकवा घालवा.
मकर रास
थोडा संयम ठेवा. साडेसातीने शिकवलेल्या गोष्टी विसरू नका. जीभेवर गोडवा ठेवा. आरोग्याची चांगली साथ मिळेल.
कुंभ रास
नवीन नोकरीच्या संधी चालून येत आहेत. संधी दवडू नका, आज स्टार्ट बटन दाबाचं !
मीन रास
कामाचा ताण आहे. पण आजचे काम उद्यावर ढकलू नका. पूर्ण करा. कंटाळा येईल पण परिश्रम टाळू नका.