वाशीम : संताप अनावर झाला की माणूस विवेकी बुद्धी सोडून होत्याचं नव्हतं करू शकतो. धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. प्रवास करताना नवरा-बायकोमध्ये वाद झाला. यावेळी गाडीमध्ये या दोघांची तीन चिमुकली मुलं देखील होती. संतापाच्या भरात पतीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून क्षणार्धात सगळं संपवलं. हा भयानक प्रसंग या तीन चिमुकल्यान देखतच घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान नामक व्यक्ती मूळचे उत्तर प्रदेश येथे राहणारे काही कारणाने प्रवास करून महाराष्ट्रात आले होते. यावेळी समृद्धी महामार्ग येथून जात असताना दोन्हीही पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून मोठं भांडण झालं. रागाच्या भरात पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. यानंतर स्वतः आरोपी सलमान खान यांनी कारंजा पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. या घटनेमध्ये हसीन खान यांचा मृत्यू झाला आहे.
संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली ही घटना एवढ्यावरच संपणार नाही. तीन चिमुकल्यांची आई आता या जगात राहिलेली नाही. वडिलांना आता अटक झाली आहे. अशात आता तीनही मुलं अनाथ झाली आहे. हृदय पिळवटून टाकणारा क्षण म्हणजे जेव्हा वडिलांनी कारंजा पोलीस स्थानकामध्ये सरेंडर केले तेव्हा या तीनही मुलांना पोलीस स्टेशनमध्ये एका ब्लॅंकेटवर टाकले असता तीनही मुलं शांत झोपी गेली. पुढच्या आयुष्यात येणाऱ्या वादळासाठी तयार नाहीत पण एवढ्या मोठ्या संकटाला आता सामोरं जावं लागणार आहे एवढी मानसिक कुवतच अजून नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी सलमान खान यास ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू आहे.