CRIME PUNE : पिंपरी चिंचवडमध्ये 2 गुन्ह्यात फरार सराईत गुंडाला बेड्या, 1 गावठी पिस्तूल आणि 4 काडतुसे जप्त - टॉप न्यूज मराठी

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 6 ने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने अवैध धंद्यावर कारवाई करणे करीता दिनांक 28/08/2025 रोजी युनिट 6 कडील सहा पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उप निरीक्षक आशिष जाधव आणि स्टाफ असे पिंपरी चिंचवड परिसरात पेट्रोलिंग करत होते.

पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक संतोष कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काळेवाडी, म्हसोबा महाराज मंदिराच्या जागेत, शेतर येथे काळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीवर एक इसम अंगावर बेकायदा गुलाबी रंगाचा शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला संशयितरित्या फिरत आहे. सदर इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून तो फिरणे व दहशत माजवणे याबत गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर ठिकाणी वरिष्ठ स्टाफसह जाऊन शिताफीने संशयित इसमाला जाबाबत पकडून त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सुशील तानाजी गायकवाड वय 39 वर्ष रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या वाहतुकीच्या गावठी बनावटीचे पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे, 02 मोबाईल व 1 मोटर सायकल असा एकूण 9,29,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 34/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. गोरख इसरम, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 3 श्री. राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शॉट, सहा पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उप निरीक्षक आशिष जाधव यांच्या समोर सांगोळे, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब सकटे, अमित काळे, अमित सरते, नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, ज्ञानेश्वर पठाण, गणेश मान, अक्षय वाबळ, म. सपोफौ अरुणा म्हेत्रे, म. पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे यांचे पथकाने केली आहे.