crime pune : थंड डोक्याने कट रचला; पण लोहगडावरच्या 'त्या' सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांनी केतनच्या हत्याऱ्यांना पकडले, नेमकं काय घडलं लोहगडावर? वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल या युवकाच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. 18 जून रोजी केतन अग्रवाल आणि त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हे दोघे लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले असताना पाय घसरून केतन अग्रवाल दरीत कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. पण अत्यंत थंड डोक्याने आणि क्रूरपणे त्यांची भावी पत्नी सिया गोयल हिने कट रचून केतन अग्रवाल यांची हत्या केल्याचं आता उघडकीस आल आहे.

 नेमकं प्रकरण काय 

केतन अग्रवाल हा बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. दरम्यान येत्या नोव्हेंबरमध्ये केतन आणि सिया यांचा विवाह पार पडणार होता. दोन्हीही घरांमध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. लग्नासाठी तब्बल 14 कोटींचा पॅलेस बुक करण्यात आला होता. तर दोन विमाने देखील वऱ्हाडी मंडळींसाठी बुक करण्यात आली होती. पण अचानक 18 जून रोजी लोहगडावर सिया आणि केतन ट्रेकिंगसाठी गेले असताना केतनच्या अपघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धक्कादायक म्हणजे जेव्हा ही हत्या दुसरी कोणी नाही तर केतनच्या भावी पत्नीने कट रचून केली असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल्याने मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार सिया गोयल हिला हे लग्न मान्य नव्हते. सिया गोयल हिचे कॉलेजमध्ये चेतन चौधरी यांच्यासोबत प्रेम संबंध होते. परंतु सिया गोयल हिच्या कुटुंबीयांनी बळजबरीने तिचे लग्न केतन अग्रवाल याच्यासोबत ठरवले होते. आपल्या प्रेमातील अडसर दूर करण्याच्या भयानक उद्देशानेच सिया आणि चेतन या दोघांनी केतनची हत्या करून प्रेमातील हा अडसर कायमचा दूर करण्याचा कट रचला. पण अखेर या घटनेनंतर आता तीन कुटुंब उध्वस्त झाली आहेत.

विशेष म्हणजे लग्न ठरल्यापासून केतन अग्रवाल यांनी आपले वडील विशाल अग्रवाल यांच्याकडे देखील सियाच्या वागणुकीबद्दल चर्चा केली होती. परंतु नात्यातूनच आलेल्या या सोयरीकडे त्यावेळी विशाल अग्रवाल यांचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगलाच होता. त्यावेळी मुलाने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे विशाल अग्रवाल यांना आता मोठे दुःख आहे.

 एकंदरीत घटनेतील धक्कादायक खुलासा म्हणजे सियाने केलेला हा पहिला प्रयत्न नव्हता. अत्यंत थंड डोक्याने दोघेही मिळून केतनच्या हत्तेचा कट करत होते. या आधी केतन आणि सिया बाली येथे प्री-वेडिंग शूट साठी देखील जाणार होते. परंतु अचानक केतनचा पासपोर्ट हरवल्याने ही ट्रीप रद्द करण्यात आली होती. यावरून सियाने केतन सोबत मोठे भांडण देखील केले. पण तपासानंतर निष्पन्न झालेल्या माहितीनुसार सियानेच केतनचा पासपोर्ट लपवल्याचे देखील तिने मान्य केले आहे. लोहगडावर या आधी देखील केतन आणि सिया ट्रेकसाठी गेले होते. परंतु त्यांचा प्लॅनिंग त्यावेळी यशस्वी होऊ शकला नाही. परंतु 18 जून रोजी सीयाने खूपच हट्ट केल्याने केतन आणि सिया दोघे लोहगडावर ट्रेकसाठी गेले आणि यावेळी मात्र तिचा कट यशस्वी झाला.

 कसा झाला हत्येचा उलगडा 

18 जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडुपांमध्ये केतनचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर पोलीस तपास सुरू असताना घटना घडते केवळ सिया त्याच्या जवळ होती. त्यामुळे तिची चौकशी सुरू असताना तिच्या एकंदरीत संशयास्पद वागणुकीमुळे पोलिसांना संशय आला. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके नेमून सखोल चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान पोलिसांनी लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता भर उन्हामध्ये एक व्यक्ती जाड हुडी घालून आणि चेहरा लपवण्याच्या उद्देशाने मास्क लावून सिया आणि केतनच्या आसपास फिरताना दिसला. यावरून पोलिसांनी तपासाची सूत्रे वळवली असता सिया आणि चेतनमध्ये देखील संशयास्पद खानाखुणा करत असल्याचे निदर्शनास आले. आणि पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रेमप्रकरणांमध्ये अडचण होत असल्याच्या कारणावरून चेतन आणि सिया यांनीच हा कट रचल्याचे दोघांनी कबूल केले आहे.

 सिया गोयल ही तरुणी 20 वर्षाची आहे तर केतन हा 25 वर्षाचा युवक होता. या घटनेनंतर खरंतर युवा पिढीच्या मानसिक आणि वैचारिक मतांचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील अभ्यास होणे आवश्यक आहे.