पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील कोलकत्ता जवळ असलेल्या बारूईपुरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. अवघ्या 12 वर्षाच्या एका निष्ठाप मुलीवर बलात्कार करून तिला जिवंत असतानाच पोत्यात गुंडाळून तलावात फेकून देणाऱ्या नराधमाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.
दरम्यान या आरोपीच्या आईने देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, " दोन पोलीस अधिकारी माझ्या घरी आले. त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलाचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. तुम्हाला रुग्णालयात जायचं आहे का ? त्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे वाटतं ते करा मला काहीच समस्या नाही. माझ्या मुलाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. मी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही. त्यांनी कधीच चांगलं काम केलं नाही. त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली. अशा भाषेत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलीवर प्रभाष मंडल यांनी बलात्कार केला. ही मुलगी शनिवारी तिच्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू घेण्यासाठी म्हणून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. म्हणून कुटुंबीयांनी पोलिसात मिसिंग दाखल केली होती. रविवारी या मुलीचा मृतदेह तलावात आढळून आला त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये प्रभास मंडल याला ताब्यात घेण्यात आले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास आरोपी प्रभास मंडल याला पोलीस गुन्हा रिक्रिएशन करण्यासाठी म्हणून घेऊन जात असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.