CRIME HINGOLI : दुसरे लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची लग्न मंडपातच पहिल्या पत्नीला मारहाण; दुसऱ्या लग्नाबद्दल जाब विचारला म्हणून संताप अनावर ! - टॉप न्यूज मराठी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पहिली पत्नी जिवंत असताना आणि तिच्याशी घटस्फोट देखील झालेला नसताना एका पोलीस कर्मचाऱ्यांन थेट दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर उभा राहिला. पत्नीला कळताच तिने लग्न मंडपात येऊन जाब विचारला असता भरमंडपातच पहिल्या पत्नीला या पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, प्रशांत गजभारे यांनी आपल्या पत्नीला ड्युटीवर जात आहे असं सांगितलं. गजभारे हा नांदेड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे.  दरम्यान पत्नीला प्रशांत गजभारे यांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली असता त्या थेट लग्न मंडपात येऊन धडकल्या. घटस्फोट नाही आणि मी जिवंत असताना दुसरे लग्न कसं करतात ? असा जाब विचारला म्हणून कोणताही विचार न करता प्रशांत गजभारे यांनी आपल्या पत्नीला भर मंडपातच मारहाण करायला सुरुवात केली. याप्रकरणी सध्या वसमत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

या प्रकरणी कायद्याचा रक्षकच कायद्याचा भक्षक बनला आहे. त्यामुळे त्याला आता नेमकी काय शिक्षा होते हे अशा डगाबाजांसाठी अद्दल घडवणारे ठरेल.