Crime : सावंतवाडीत 43 लाखांची बेकायदा गोवा दारू जप्त, सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांची मोठी कारवाई, आंध्र प्रदेशातील दोघांना अटक - टॉप न्यूज मराठी

सावंतवाडी - सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा पोलीस चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची मोठी वाहतूक उघडकीस आणली आहे.

गोवा राज्यातून आंध्र प्रदेशकडे चाललेल्या एका आयशर कँटरवर धडक कारवाई करत पोलिसांनी 42 लाख 98 हजार 400 रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला आहे.

या प्रकरणात आंध्र प्रदेशातील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कँटरसह दारूचा साठा ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

सातार्डा चेकपोस्टवर नियमित तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. गोव्यातून महाराष्ट्र मार्गे इतर राज्यात होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी तपासणी अधिक कडक केली आहे.