मुंबई : राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप सुरूच असतात त्या सध्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रभर तांडव सुरू आहे अशात करोडो रुपये खर्च करून बनवलेला मिसिंग लिंक वर दरड कोसळल्याने आज पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी मोठा गदारोळ केला आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनी मला शिव्या द्या मला त्याची सवय आहे मी शिव्या प्रूफ आहे पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही अशा शब्दात विरोधकांना ठणकावला आहे.
नेमकं काय घडलं ?
अतिवृष्टीमुळे करोडो रुपये खर्च करून बांधलेला पुणे आणि मुंबईला जोडणारा मिसिंग लिंक वर दरड कोसळली यावरून विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली होती यावरच आज पावसाळी अधिवेशनात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरजले ते म्हणाले की, " कनेक्टिंग लिंकचा विषय खूपच गाजला. या कनेक्टिंग लिंकबाबत विरोधकांनी केलेला सगळा खोटारडेपणा बाहेर आला. महायुती सरकारची हिम्मत होती म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला. ज्या वेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली, तेव्हा लोक असंच म्हणायचे की ही रेल्वे चालू शकणार नाही. या भागात दरड कोसळते असे सांगितले जायचे. परंतु तेव्हा मधू दंडवते या व्यक्तीमध्ये हिम्मत होती. त्यांनी ही रेल्वे बांधून दाखवली. त्यानंतर दरवर्षी दरड कोसळायची. परंतु त्यातून आपण शिकायचो. दरड कोसळणं बंद करायचो. भीतीने कोकण रेल्वे तयार केली नसती तर काय अवस्था राहिली असती." अशी आठवण त्यांनी करून दिली.
मिसिंग लिंकचा इतिहासची असाच आहे. आघाडीचे सरकार होते. त्या आघाडीच्या सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हा आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून 14 कारणं दिली आणि मिसिंग लिंकची फाईल बंद केली. पण आम्ही निर्णय केला की मिसिंग लिंक बांधायचाच. आपण हे करू शकतो, असं समजलं. आता आपण ते करून दाखवलं. आपण कनेक्टिंग लिंक तयार करून दाखवला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा तयार करून दाखवला. भारतातला सर्वात केबल स्ट्रेड ब्रिज आपण तयार करून दाखवला." अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना प्रतिउत्तर दिल आहे.