CM DEVENDRA FADANAVIS : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कर्जमाफी तर मिळणारच, पण आता वीज बिल देखील होणार माफ ; वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले - टॉप न्यूज मराठी

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे एक मोठे गिफ्ट दिलेच आहे. अर्थात अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. प्रक्रिया सुरू आहे असं सांगण्यात आलं आहे. मात्र कर्जमाफीची घोषणा झाली असून लवकरच ती अमलात देखील येईल असं सांगितलं जात असताना, आज मुख्यमंत्र्यांनी तब्बल 48 हजार कोटींचे वीज बिल माफ करण्याची देखील घोषणा केली आहे.

दरम्यान आज भाजपच्या प्रदेश समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी कर्जमाफी केल्याच्या निर्णयाबाबत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वीज बिल माफी करण्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून दोन गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावरपर्यंत वीज बिलं आपण माफ केलीत. वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतो. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पावरची जुनं बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत, कधीही कंपनीचा कर्मचारी वसूलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48 हजार कोटींचे जुने बिल माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतोय." असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanavis म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि विज बिल माफी ही एक चांगली बातमी नक्कीच ठरते आहे.याची अंमलबजावणी आता केव्हा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.