Cloudburst in Nashik : नाशिकमध्ये ढगफुटी होणार ? त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड दर्शनासाठी बंद; प्रशासन नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज - टॉप न्यूज मराठी

नाशिक : महाराष्ट्रात 1 जुलैपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ Heavy Rain घातला आहे. दरम्यान पाच आणि सहा जुलैला पावसाचा जोर पाहता महाराष्ट्र प्रशासनाने देखील सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा असे आवाहन केले असतानाच आता नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये Nashik हवामान खात्यांन दिलेल्या अंदाजानुसार ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्या नाशिकमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. अशातच आता ढगफुटी Cloudburst in Nashik देखील होण्याची शक्यता वर्तवल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ढगफुटी होऊ शकते असं हवामान विभागाने सांगितल आहे. सध्या देखील नाशिकमध्ये तुफान पाऊस सुरू आहे.  खबरदारी म्हणून सात जुलैला देखील सर्व शाळा आणि कॉलेज बंद राहणार आहेत. आठवडी बाजार देखील बंद राहणार आहेत. त्याचबरोबर पावसाचा जोर पाहता शेतकऱ्यांनी देखील शेतात जाऊ नये असं देखील प्रशासनाने आवाहन केलं आहे. नागरिकांनी अति आवश्यक नसेल तोपर्यंत प्रवास करणे टाळावे काही रस्ते देखील बंद केले जाणार असून दरड कोसळण्याची देखील मोठी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे. 

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने कोणत्या प्रकारचे नियोजन केले आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, नाशिकमध्ये ढगफुटी होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्या प्रकारचे नियोजन केले आहे, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. 

दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गडाचे दर्शन सध्या बंद ठेवण्यात आल आहे. नाशिक, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता असून कळवण, सटाणा या भागातही पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अति आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं अन्यथा घराच्या बाहेर देखील पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे.