CJP Protest Update: "आंदोलकांसोबत बैठक पार पडली; आंदोलन मागे घ्या !" जे पी नड्डा नेमके काय म्हणाले - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान Union Education Minister Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण आणि आज संसद भवनावर काढण्यात आलेला मोर्चा यामुळे दिल्लीच वातावरण प्रचंड तापलं आहे. दरम्यान अशातच आता हे आंदोलन थांबवावं असं आवाहन जे पी नड्डा यांनी केले आहे. ते म्हणाले की, " जनजीवन पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना मदत करावी. आंदोलकांकडून सरकारकडे चर्चेचा पहिला प्रस्ताव आला आहे. आमची आंदोलकांसोबत चर्चा सुरू आहे. शिष्टमंडळासोबत चर्चा व्यवस्थित पार पडली असून हे आंदोलन आता मागे घ्यावं असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं. 

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक Sonam Wangchuk यांनी कठोर उपोषण केले. त्यांची तब्येत खालावल्यानंतर आणि संसद भवनावर मोर्चा काढण्याची हाक दिल्यानंतर वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापले.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज संसद भवनावर मोर्चाची हाक दिली होती. दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तरीही संसद भवनावर काही विद्यार्थी आणि समर्थक धडकले. 

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि आत्महत्या केलेल्या सर्व नीट NEET परीक्षार्थींच्या कुटुंबीयांना 1 कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान यावर नेमकी अंमलबजावणी कशी होते सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी पुढे काय भूमिका घेतात. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.