Check Bounce Case : अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका ! चेक बाऊन्स प्रकरणात 3 महिन्यांचा तुरुंगवास - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला Rajpal Yadav दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi High Court मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला चेक बाऊन्स प्रकरणात Check Bounce Case तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एम.एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या खटल्यात न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना त्यांच्यावरील सात चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2010 मध्ये 'आता पता लपता' या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपये कर्ज घेतलेल्या कंपनी सोबतच्या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी, मे 2024 मध्ये, एका सत्र न्यायालयाने त्याला त्याच चेक-बाउन्स प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्याच्या वकिलाने दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य होईल असे न्यायालयाला आश्वासन दिल्यामुळे, हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्राकडेही वर्ग करण्यात आले.

मात्र, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, राजपाल यादव यांनी वारंवार मुदतवाढ मागून तसेच तडजोडीचे आश्वासन देऊनही ठरलेली रक्कम जमा केली नाही. न्यायालयाने हेही नमूद केले की, २.५ कोटी रुपयांची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी त्यांनी मागितली होती; मात्र त्या अटींचेही पालन करण्यात ते अपयशी ठरले. या सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.