CHANDRAKANT PATIL : तपास यंत्रणांनी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याचा तपास शर्थीने केला; गुन्हे करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही ! - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर Nasarapur Rape and Murder Case मध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर आज अखेर 55 दिवसानंतर निकाल जाहीर करण्यात आला या निकालानंतर सर्वच स्तरातून पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे आभार मानले जात आहेत दरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil यांनी देखील तपासात सहभागी यंत्रणा आणि न्यायंत्रणेचे आभार मानले आहेत.

चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, नसरापूर प्रकरणात नराधमाला 55 दिवसांत फाशीची शिक्षा झाली. नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद होती. एका चिमुरडीवर अत्याचार आणि तिचं आयुष्य संपुष्टात आल्यानं देशभर शोक-संतापाची लाटच उसळली. भीमराव कांबळे नावाच्या आरोपीचा हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ मानून पुणे सत्र न्यायालयाने त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचं स्वागत. या प्रकाराची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. वेगाने तपास करा आणि तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यंत्रणांनीही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याचा तपास शर्थीनं केला. कुठलाही कच्चा दुवा, पळवाट काढता येणार नाही, अशा प्रकारचा तपास आणि भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला आणि आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली.  एक माणूस म्हणून प्रत्येकालाच या निकालाचा निश्चितच आनंद झाला असेल. या निकालातून, असे गुन्हे करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांना गुन्ह्याची सजा तातडीने मिळेल, असा इशाराच महायुती सरकारनं दिला आहे. या गुन्ह्याचा काटेकोर तपास करून आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल, अशा प्रकारे तपास करणारे आमचे पोलिस, तपासात सहभागी अन्य यंत्रणांचे आणि माननीय न्याययंत्रणेचेही आभार. अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

दरम्यान आज 29 जुलैला निखळ जाहीर झाल्या नंतर पोलीस प्रशासन आणि न्यालयाच्या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होते आहे. अखेर त्या चिमुकलीला आणि तिच्या जन्मदात्यांना न्याय मिळाला आहे. तरी या नराधमाला भर चौकात फाशी द्या अशी संतापात भावना जनमाणसातून व्यक्त होते आहे.