CBSE New Rule 2026 : आता वर्षातून दोन वेळा 10 वी बोर्ड परीक्षा, पहिली अनिवार्य दुसरी ऐच्छिक, जाणून घ्या संपूर्ण नियम - टॉप न्यूज मराठी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने विद्यार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2026 च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी ची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार घेण्यात आला आहे.

यामागचा उद्देश काय ?

NEP 2020 मध्ये सांगितले आहे की बोर्ड परीक्षेचा ताण कमी करायचा आहे. एकाच परीक्षेवर सगळे भवितव्य अवलंबून राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.

नवा नियम नेमका काय आहे ?

1. पहिली परीक्षा अनिवार्य - 

पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. 17 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 ही पहिल्या टप्प्याची तारीख आहे. या परीक्षेला बसणे सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. याचा निकाल एप्रिल महिन्यात लागेल.

2. दुसरी परीक्षा ऐच्छिक - 

दुसरी परीक्षा मे महिन्यात होणार आहे. 5 मे ते 20 मे 2026. ही परीक्षा ऐच्छिक आहे. जर तुम्हाला पहिल्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही दुसऱ्या परीक्षेला बसू शकता. याचा निकाल जून महिन्यात लागेल.

3. किती विषयात सुधारणा करता येणार ? 

विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 विषयात मार्क्स सुधारण्यासाठी परीक्षा देता येणार आहे. हे विषय आहेत - विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा.

4. बेस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार - 

  • तुम्ही दोन्ही परीक्षा दिल्या तर दोन्ही पैकी जो बेस्ट स्कोर असेल तोच अंतिम मार्कशीटवर घेतला जाईल.

5. महत्वाचे नियम -

  • जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेत 3 किंवा 3 पेक्षा जास्त विषयांना गैरहजर राहिला तर त्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्याला Essential Repeat मध्ये टाकले जाईल आणि पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल.
  • Internal Assessment आणि Practical परीक्षा वर्षातून फक्त एकदाच होणार आहे.
  • हिवाळी भागातील शाळा, खेळाडू विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत आहे, ते दोन्ही पैकी कोणत्याही एका टप्प्यात परीक्षा देऊ शकतात.

फायदा काय होणार ?

विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होईल, कोचिंग क्लास वर अवलंबून राहावे लागणार नाही आणि एक संधी हुकली तरी दुसरी संधी मिळणार आहे. सध्या हा नियम फक्त 10 वी साठी आहे, पण भविष्यात 12 वी साठी पण असा विचार सुरु आहे.