Budhwar peth Red light Area police : 4 फ्लॅट सील, 3 बांगलादेशी महिला ताब्यात;पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. यात चार फ्लॅट एक वर्षासाठी सील केले असून, 

भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलंय. 

फरासखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणाच्या तपासा दरम्यान काही फ्लॅटमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवार पेठेतील ‘बेगम बिल्डिंग’, ‘न्यू वेलकम बिल्डिंग’ तसेच दाणे आळी परिसरातील एका वाड्यातील एकूण चार फ्लॅटवर कारवाई केली.

 तसेच घुसखोरी करून भारतात आलेल्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं. याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.