१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टेलिकॉम मार्केटमध्ये कंपन्यांनी ग्राहकांसाठी धमाकेदार 'फ्रीडम ऑफर्स' देण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी एक खास फ्रीडम प्लॅन लाँच केला आहे. या खाजगी कंपन्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने देखील आपला विशेष 'फ्रीडम पॅक' बाजारात आणून मोठी खळबळ उडवून दिली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या या खास ऑफर अंतर्गत ग्राहकांना अवघ्या १५० रुपयांमध्ये देशातील ३ मोठ्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
• या ओटीटी ॲड-ऑन पॅकची मूळ किंमत १९९ रुपये आहे, मात्र मर्यादित कालावधीच्या फ्रीडम ऑफर अंतर्गत हा प्लॅन ग्राहकांना ४९ रुपये सवलतीसह फक्त १५० रुपयांत उपलब्ध करून दिला जात आहे
• यामध्ये युजर्सना एकाच वेळी SonyLiv, JioHotstar आणि Zee5 या तिन्ही प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
• या स्वातंत्र्य दिन विशेष फ्रीडम पॅकची वैधता ३० दिवसांची असणार आहे.
• बीएसएनएलच्या भारत फायबर आणि ब्रॉडबँड (एफटीटीएच) युजर्ससाठी आणली गेली आहे.
कसा ॲक्टिव्हेट करावा? हा स्वस्त ओटीटी प्लॅन ॲक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहक CinemaPlus Portal वर लॉग इन करू शकतात किंवा कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबर 1800-4444 वर संपर्क साधून हा पॅक आपल्या ब्रॉडबँड कनेक्शनवर जोडून घेऊ शकतात.