BREAKING : मोशीमध्ये इमारत ढासळली ! 14 लोक अडकले असण्याची शक्यता - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यातील मोशी भागातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मोशी कचरा डेपोजवळ एक मोठी इमारत ढासाळली असून या इमारतीच्या मलब्याखाल 14 जण अडकले असल्याचं म्हटलं जातंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ एक मोठी इमारत ढासळली आहे या इमारतीच्या मलब्याखाली 14 जण अडकले असल्याचं म्हटलं जातंय. घटनेची माहिती मिळताच सध्या बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. सध्या बचाव कार्य वेगाने सुरू आहे. 

पुण्यामध्ये मुसळधार पावसाने अजूनही री ओढून धरली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे, पुराचे पाणी साचून राहते आहे. अपघात दरड कोसळणे, झाडपडी अशा अनेक घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवड भागातील मोशीमधून आज इमारत कोसळल्याने खळबळ उडाली आहे.