मनोरंजन विश्व : खरंतर मनोरंजन विश्व असो किंवा अगदी सर्वसामान्यांचा संसार, विभक्त होणे याहून मोठं संकट, दुःख दुसरे नाही. कारण यातून केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब आणि सर्वात मोठं दुःख हे मुलांना भोगावे लागत. अशाच मोठ्या त्रासातून 2022 साली अभिनेता सोहेल खान आणि त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेह गेले होते.
दरम्यान नुकत्याच अलायन्स या शोमध्ये अभिनेता सोहेल खान देखील सहभागी झाला आहे. तर त्याची एक्स वाइफ सीमा ही देखील या शोमध्ये आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये सोहेलला विचारलेल्या किचकट प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिल आहे. या स्पर्धेमध्ये झेड दरबार सोबत बोलताना त्याने आपल्या तुटलेल्या नात्याबद्दल मोकळेपणानं व्यक्त होताना म्हटल आहे की, सीमा माझ्या दोन मुलांची आई आहे. त्यामुळे आत्ता माझ्या मनात तिच्याविषयी प्रेमापेक्षा जास्त आदर आहे. योहान आणि निर्वाण ही दोन्ही मुलं असून सीमा मुलांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा त्याच्या घरी जाते. सीमाकडे आजही घराच्या चाव्या असल्याचे देखील सोहनी सांगितलं.
हे नातं नेमकं का तुटलं ? यावर देखील सोहेल खान मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. तो म्हणाला की, त्यावेळी माझं काम ठीक चालत नव्हतं. माझी मनस्थिती खराब होती. माझ्या वागण्यामुळेच मी तिला गमावलं आहे. असं देखील तो स्पष्टपणे म्हणाला आहे.