येत्या काळात तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत घालणार असाल किंवा नुकतीच तुमची मुलं शाळेत जाऊ लागली असती तर ही बातमी तुमच्यासाठी..
उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा आणि हजारो शिक्षण संस्था असल्यानं पुणे शहराला शिक्षणाचं माहेर तर म्हटलं जातं. याच पुण्यात आता बोगस शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते.
पुणे महानगरपालिकेने यंदाच्या वर्षीही 13 बोगस शाळांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे तुमचा मूलही बोगस शाळेत तर नाही ना ? याची खात्री करणं अत्यंत गरजेचं झालंय.
तर दुसरीकडे मागच्या वर्षीच बोगस असल्याचं जाहीर केलेल्या पाच शाळा वर्षभर सुरू असून यावर्षी सुद्धा पुन्हा या यादीत त्यांचं नाव आलंय.
त्यामुळेच या पाच शाळांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. पाहूया यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट..
पुण्याची वाढती लोकसंख्या, बाहेरून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या पाहून गेल्या काही वर्षात शाळांचं प्रमाण वाढलंय.
प्रत्येक भागात एकापेक्षा जास्त शाळा पाहायला मिळतात. मात्र बहुतांश शाळा या मान्यताप्राप्त नसल्यासही उघड होतंय.
अशाच शाळांवर वचक बसण्यासाठी पुणे महानगरपालिकेने मागच्या वर्षी देखील एक पत्र काढलं होतं. ज्यामध्ये बोगस शाळांची यादी दिली होती.
त्याच पार्श्वभूमीवर यंदा देखील शैक्षणिक वर्ष 2026- 27 साठी बोगस शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात सध्या 13 बोगस शाळा सुरू आहेत.
मात्र या 13 पैकी पाच अशा शाळा आहेत ज्या मागच्या वर्षी सुद्धा या यादीमध्ये होत्या. याचाच अर्थ मागच्या वर्षी यादी जाहीर करूनही या शाळा वर्षभर सुरू होत्या.
त्यामुळेच यंदाच्या वर्षी पुन्हा त्यांचं नाव या यादीत सामील करण्यात आलं आहे. या शाळा कोणत्या आहेत पाहूया...
1. न्यू मिलीनियम स्टार, इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी
2. महात्मा गांधी प्रशाला, येरवडा
3. टिम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, कोंढवा
4. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल, कोंढवा
5. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर
या पाच शाळा मागच्या वर्षीच्या यादीत आणि यावर्षीच्या यादीतही कॉमन आहेत. तर या व्यतिरिक्त 8 नव्या शाळांचा समावेश झालाय.
6. आकांक्षा अकॅडमी स्कूल, लोणी काळभोर
7. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयर्न पब्लिक स्कूल, मानाजीनगर नऱ्हे
8. लेगसी हायस्कूल, अश्रफनगर, कोंढवा
9. शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, अश्रफनगर, कोंढवा
10. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री
11. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कौसरबाग, कोंढवा
12. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव
13. आयर्न वर्ल्ड स्कूल, उंड्री
शैक्षणिक वर्ष 2026 - 27 साठी बोगस शाळा म्हणून जाहीर केलेल्या शाळांमध्ये ऍडमिशन घेऊ नका.
अन्यथा तुमच्या पाल्याचा नुकसान होईल. असं म्हणत महानगरपालिकेने ही यादी जाहीर केली.
मात्र ज्या पाच शाळा या यादीमध्ये रिपीट झाल्या आहेत. त्यात कुणाच्या वरदहस्ताने वर्षभर सुरू होत्या ?
महानगरपालिकेचे अधिकारी आणि या शाळा यांचं काही साटंलोटं आहे का ? आणि
जर मागच्याच वर्षे या शाळा बोगस डिक्लेअर केल्या होत्या, तर वर्षभरात या शाळांवर कारवाईका झाली नाही ?
शाळा बंद का पाडल्या गेल्या नाही ? शिक्षण विभागाने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं की दुर्लक्ष झालं ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.