मेरठ न्यायालयाने ब्लू ड्रम हत्या प्रकरणात मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला असून मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.
ब्लू ड्रम प्रकरण नेमके काय
हे संपूर्ण प्रकरण 3 मार्च 2025 रोजी घडले होते. आरोपी मुस्कान रस्तोगी हिने आपला पती सौरभ राजपूत याची तिचा प्रियकर साहिल शुक्ला याच्या मदतीने हत्या केली होती. या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ब्लू ड्रममध्ये भरून लपवण्यात आले होते. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती आणि या प्रकरणाला ब्लू ड्रम हत्याकांड म्हणून ओळखले जाऊ लागले. पोलिस तपासात दोन्ही आरोपींविरोधात भक्कम पुरावे मिळाले होते.
या खटल्याची सुनावणी मेरठ न्यायालयात सुरू होती. अखेर आज न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. सौरभ राजपूत याला अखेर न्याय मिळाला असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.