पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघा जणांना न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज अटक केल्यानंतर दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान सरकारी वकील आणि अगरवाल कुटुंबीयांच्या वतीने वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार तपासातील अनेक बाजूंचा अद्याप छडा लावणे बाकी आहे. त्यामुळे दोघांचीही पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यानुसार आता तीन जुलै पर्यंत दोघांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.
18 जून रोजी केतन अग्रवाल या तरुणाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान ही हत्या त्याच्याच भावी पत्नीने आणि तिच्या प्रियकरांना केल्याचं तपासात उघड झाले आहे. रोज नवीन बाजू कळत असून अद्याप देखील अनेक साक्षीदार, कुटुंबीयांची साक्ष, सियाच्या मित्र-मैत्रिणींची साक्ष तपासली जाते आहे. त्यामुळे पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आता या दोघा जणांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतन अग्रवाल सोबत लग्न मान्य नव्हतं. तो विग लावायचा आणि बोलताना अडखळायचा या कारणामुळे त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं असं सीयाने सांगितलं. हे कारण खरं तर खूप धक्कादायक आहेत. दरम्यान चेतन आणि सिया या दोघांना पुन्हा लोहगडवर नेऊन घटनाक्रम कसा घडला हे पाहण्यात आल आहे. अनेक प्रकारे तांत्रिक बाजू देखील तपासल्या जात आहेत. त्यामुळे आता पोलीस तपासानंतर हे प्रकरण काय वळण घेते आणि आता तीन जुलैला काय घडते याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.