BIG NEWS : अंधेरीत बसचे ब्रेक फेल; अपघातात नागरिक जखमी, वाहनांचे मोठे नुकसान - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागात बसचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. काही जण जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या अपघातात 14 गाड्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, काही वेळा पूर्वी मुंबईच्या अंधेरी भागात बेस्टच्या भरधाव बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल. या अपघातात बसने 14 गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात 10 रिक्षांचे नुकसान झाले असल्याचे समजते आहे. तसेच या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांना अंधेरीतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

-अंधेरी स्थानक पश्चिम बेस्ट बस क्रमांक 242 या मार्गावरील बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. 

-बसने अंधेरी येथील 14 गाड्यांना धडक दिली. अनेक रिक्षांचे नुकसान 

-काही नागरिक जखमी झाले आहेत. कूपर रुग्णालयात उपचार सुरु. 

-या बेस्ट चालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालकाने बसचे ब्रेस फेल झाल्याने अपघात झाल्याचे सांगितले.