BIG NEWS : नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील त्या नराधमाचा आज अंतिम निर्णय !फाशी की जन्मठेप ? - टॉप न्यूज मराठी

पुणे : नसरापूरमध्ये Nasrapur १ मे रोजी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार Rape and Murder आणि तिची निर्दयीपणे हत्या करणारा आरोपी भीमराव कांबळे वय वर्ष 65 याला आज सोमवार दिनांक 29 जून रोजी अखेर काय शिक्षा मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिला आहे. 

1 मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपी भीमराव कांबळे याने अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या केली होती. याप्रकरणी पुणे भोर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला होता. आज अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागल आहे. गुन्हा घडून आज दोन महिने झाले आहेत. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहता आणि लोकांचा रोष पाहता पोलीस प्रशासनानं तपासाची सूत्रे अत्यंत वेगाने हलवली.  

पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथके तयार करून आत्तापर्यंत मुलीचे कुटुंबीय, तपास अधिकारी, डीएनए तपासणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. दरम्यान आज भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा होती यावर निकाल लागतो आहे.