वर्धा : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या काही वेळ आधी एका मालवाहू टँकरला अपघात झाला होता. त्यामुळे या ठिकाणी इथेनॉल सांडले होते. त्यामुळे वाहनांना थांबवून ठेवण्यात आलं होतं. दरम्यान एका बाजूनेच वाहतूक सुरू होती. यावेळी शिफ्ट कारला एका टेम्पोने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये स्विफ्ट कारने आणि या टेम्पोन जागीच पेटी घेतला. या घटनेमध्ये एकाच घरातील तिघा जणांचा आणि या कारचे ड्रायव्हर यांचा मृत्यू झाला. तर टेम्पो चालक यांचा देखील मृत्यू झाला आहे. टेम्पोतील आणखीन एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये राजेश टिपले, सुषमा टिपले आणि जानवी टिपले या एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. तर ड्रायव्हर अंकुश राऊत यांचा देखील मृत्यू झालाय. हे चारही जण वर्धा जिल्ह्यातील सालोड गावचे रहिवासी होते.
या भीषण अपघातानंतर कारमधील चौघा जणांचा होरपळून दुःखद अंत झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडल्यामुळे समृद्धी आणि अपघात हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.